

दर्पण न्यूज विटा प्रतिनिधी( शिराज शिकलगार ):-
विटा नगरपरिषद आरोग्य (IEC) विभागाच्या माध्यमातून शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असून स्वच्छ सर्वेक्षण व ‘माझी वसुंधरा’ अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहासभैय्या बाबर, नगराध्यक्षा सौ. काजलताई म्हेत्रे, उपनगराध्यक्ष अमोलदादा बाबर, आरोग्य सभापती भालचंद्र कांबळे तसेच मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सुरू आहे.
या अंतर्गत शहरात जनजागृतीसाठी विशेष ‘मॉर्निंग पथक’ कार्यरत असून पहाटे ५ वाजल्यापासून शहरातील विविध भागात पाहणी करण्यात येत आहे. गुंफा परिसर, मंडले वस्ती, सावरकर नगर, मारुती मंदिर, गांधी चौक, ब्राम्हण गल्ली, फुले नगर, शंभर फुटी रोड, गणेश पेठ तसेच क्रांतिसिंह नाना पाटील पुतळा परिसरात पथकाने भेट देत परिसर अस्वच्छ करणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवले व स्वच्छतेबाबत जनजागृती केली.
यावेळी मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, कचरा ओला-सुक्या स्वरूपात वर्गीकरण करून घंटागाडीत द्यावा व आपला परिसर स्वच्छ ठेवावा. परिसर अस्वच्छ केल्यास घनकचरा व्यवस्थापन अधिनियम २०२६ नुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. शहरात मॉर्निंग व नाईट पथक कार्यरत असून नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून शहर स्वच्छतेत योगदान द्यावे, असेही त्यांनी नमूद केले.
या उपक्रमासाठी फायर स्टेशनचे कर्मचारी तसेच नगरसेवक संजय भिंगारदेवे, श्रीकांत साठे, प्रभारी आरोग्य निरीक्षक संदीप वाघमारे, मुकादम दिपक सातपुते, अर्जुन सूर्यवंशी, सुचित्रा कांबळे यांचे विशेष सहकार्य लाभले.
मॉर्निंग पथकात नितीन चंदनशिवे, शिराज शिकलगार, अभि गायगवळे, महेश झाडे, अभिजित ममदापुरे, प्रमोद भोसले, सुरज मंडले, आकाश कदम आदी कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
