दर्पण न्यूज विटा प्रतिनिधी (शिराज शिकलगार):- सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील ( पारे) येथील सतीश भुजंग राठोड ( वय वर्षे ३२,रा.पारे ता.खानापूर ) या तरुणाला त्यांच्या ओळखीचा फायदा घेत कमी दरात चोख सोने बिलासह घेतो असे सांगून ५० लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या चौघा विरुद्ध विटा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.
सविस्तर माहिती अशी की सतीश भुजंग राठोड राहणार पारे या तरुणाने विटा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती या संदर्भात सतीश भुजंग राठोड या तरुणास लखन रामचंद्र ठोंबरे ( राहणार,विटा पंचशील नगर,) व अनोळखी तीन या संशयितांनी फसवणूक केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. हा फसवणुकीचा प्रकार ३ ऑक्टोंबर २०२३ ते आतापर्यंत पारे व सोलापूर येथे घडल्याचे पोलिसांनी सांगितले. सतीश राठोड याचा रियल इस्टेटचा व्यवसाय आहे लखन ठोंबरे व तीन अनोळखींनी संगनमताने सतीश राठोड यांना कमी दरामध्ये चोख सोने बिलासह देतो असे सांगून राठोड यांचा विश्वास संपादन केला. सतीश राठोड यांच्याकडून संशयितांनी पारे व सोलापूर येथे रोख ५० लाख रुपये घेतले. मात्र संशयितांनी राठोड यांना सोने दिले नाही. त्यामुळे राठोड यांनी संशयितांनी फसवणूक केल्याचे लक्षात येताच विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे की दरम्यान लखन ठोंबरे यांच्यासह तीन अनोळखींवर गुन्हा दाखल केल्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी सांगितले. मागील काही दिवसांपूर्वी सोलापूर पोलीसांनी लखन ठोंबरे यास चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
