दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुने) :–
येरमाळा पोलीस ठाणे :आरोपी नामे-प्रशांत शिंदे, रा साकत ता. परंडा, अक्षय सोमनाथ चव्हाण, कृष्णा सतिश कदम, अनिकेत पांडुरंग उकरंडे,स्वप्निल बालाजी पौळ, राहुल उर्फ बालाजी दिलीप हालकरे, अच्युत रामेश्वर शिंदे, शुभम अच्युत शिंदे, कृष्णा नंदकुमार कचरे, सुमित अच्युत शिंदे, किशोर कचरु धावारे,सुरज अवधु, प्रतिक लोकरे, निखली काळे, रा. तेरखेडा ता. वाशी, चेतन येलकर, अभिजीत सुरवसे, रा. कडकनाथवाडी, शिवाजी जाधवर, रा. रत्नापुर तुषार शिवाजी वाघमारे, रा. बाभळगाव, रणजित पोपट लुगडे, रा. खामकरवाडी, स्वप्निल कोकाटे रा. रई ता. वाशी जि. धाराशिव यांनी दि.03.08.2026 रोजी 19.00 ते 20.00 वा. सु. लक्ष्मी पारधी पिढी तेरखेडा येथे एनएच 52 रोडवर व खामकर कॉम्पलेक्स तेरखेडा येथे फिर्यादी नामे-शुभम बलभीम खामकर, वय 28 वर्षे, रा. तेरखेडा ता. वाशी जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून दगड फेक करुन गाडीचे एकुण 15,00,000₹ किंमतीचे नुकसान केले व शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगड, काठी लोखंडी रॉडने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-शुभम खामकर यांनी दि.05.08.2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे येरमाळा येथे भा.न्या.सं.कलम 118(1), 324(5), 125(बी), 189(2), 191(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
