दर्पण न्यूज भिलवडी :- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील सार्वजनिक वाचनालय भिलवडी यांचे वतीने 1 ऑगस्ट 2026 रोजी ८० वा वाचन कट्टा वाचनालयाचे अध्यक्ष माननीय गिरीशजी चितळे यांचे अध्यक्षतेखाली उत्साहाने संपन्न झाला.
या वाचन कट्ट्यावर मी वाचलेले संत साहित्य या विषयावर अभ्यासपूर्ण चर्चासत्र संपन्न झाले. प्रारंभी वाचनालयाचे कार्यवाह सुभाष कवडे सर यांनी सर्वांचे स्वागत करून या विषयाचे महत्त्व विशद केले.
यावेळी गिरीश चितळे प्रमुख लेखनिक विद्या निकम यांचे वाचनालयाचे वतीने खास अभिनंदन करण्यात आले . श्री हनमंतराव डिसले व सौभाग्यवती उर्मिला डिसले यांनी वाचनालयास लाकडी रॅक भेट दिले व ग्रंथ ही भेट दिले. यावेळी खालील मान्यवरांनी चर्चासत्रात सहभाग घेतला. श्रीयुत बी डी पाटील भुपाल नाना मगदूम सौभाग्यवती उर्मिला डिसले वहिनी रमेश चोपडे सर ह.रा जोशी श्रीनिवास गुरव डी आर कदम महादेव जोशी जी जी पाटील गुरुजी यांनी विविध संतांची माहिती व अभंग निरूपण सांगितले. गिरीश चितळे यांनी समारोपात समर्थ रामदास संत तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज यांच्या लेखनाचे दाखले देऊन सद्यस्थितीत संत वांग्मय कसे उपयोगी आहे याचे विवेचन केले . पुढील वाचन कट्ट्यावरती व्यंकटेश माडगूळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त व्यंकटेश माडगूळकरांची साहित्य संपदा” या विषयावर वाचन कट्टा घेण्यात येणार असल्याचे कार्यवाह आणि वाचन कट्टा संयोजक सुभाष कवडे यांनी सांगितले .
या वाचन कट्ट्या साठी श्री व सौ हनमंत डिसले यांनी सहकार्य केले. यावेळी वाचक उपस्थित होते.
