दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुने) :-
दिनांक २७/०७/२०२६ रोजी सायंकाळी ६:०० वाजण्याच्या सुमारास परीक्षावधीन पोलीस उपअधीक्षक श्री. अमोल मोहिते यांना गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की, धाराशिव शहरातील शम्स चौक परिसरात एका टोयोटा इनोव्हा गाडीमधून अवैध गुटखा आणून, त्याची अन्य ठिकाणी बेकायदेशीर विक्री करण्यासाठी दुसऱ्या वाहनात शिफ्टींग केली जात आहे. वगैरे बातमीच्या आधारे परीक्षावधीन पोलीस उपअधीक्षक श्री. अमोल मोहिते व पोलीस निरीक्षक कुमार दराडे, पोउपनि अक्षय डिघोळे, सपोफौ / ३०० क-हाळे, पोअं/ १४५ जाधवर, चालक पोहेकॉ / ४५६ रणनवरे आणि पोअं/ १०४८ नाईकवाडी यांच्या पथकाने वरीलप्रमाणे मिळाले बातमी ठिकाणी गाझी स्कूलजवळ अचानक छापा टाकला असता, सदर छाप्या दरम्यान आरोपी सलमान गुलाम शेख, रा. इंदापूर, ता. वाशी, जि. धाराशिव हा इनोव्हा चारचाकी क्रमांक एम एच २४ व्ही १६४२ मधून गुटख्याचे गोणी काढून महिंद्रा मालवाहतूक पिकअप क्रमांक एम एच १२ एस एफ ४०७० मध्ये शिफ्ट करत असताना रंगेहात पकडला गेला.वर नमूद आरोपी सलमान गुलाम शेख याच्या ताब्यामध्ये मिळून आलेल्या गोणीमध्ये महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याची पॉकेट मिळून आले असून, त्याचे किंमतीसह सविस्तर वर्णन खालीलप्रमाणे- १. बादशहा गुटखा- २,७९५ पॅकेट किंमत रुपये ४,१९,२५०/- २. गोवा गुटखा (लाल)- ७० पुडे – किंमत रुपये १७,५००/- ३. गोवा गुटखा (हिरवा – सिल्व्हर)- ९५ पुडे किंमत रुपये १६,६२५/४. डायरेक्टर स्पेशल पान मसाला- ६३ पॅकेट – किंमत रुपये २७,२१६/५. निळया रंगांचा विमल पान मसाला- ३९६ पॅकेट किंमत रुपये ७८,४०८/६. निळया रंगांचा V१ तंबाखू किंग पॅक- ३९६ पॅकेट किंमत रुपये ८,७१२/७. विमल पान मसाला (लाल-निळा रंग) ३८७ पॅकेट किंमत रुपये ४०, ६३५ /८. V१ तंबाखू किंग पॅक ३८७ पॅकेट किंमत रुपये १७,४१५ /- १०. ९. राज निवास सुगंधित पान मसाला (लाल) ५० पॅकेट किंमत रुपये ७,५००/राज निवास सुगंधित पान मसाला (निळा ४० पॅकेट किंमत रुपये ३,६००/प्रिमियम KNO ZAFRAVI ZARDA ४० पॅकेट किंमत रुपये ३,८४०/१२. प्रिमियम शॉट लक्झरी च्युबिंग टोबॅको ६३ पॅकेट किंमत रुपये ४,५३६/किंमत रुपये १९. ३६०/- ११.विमल पान मसाला (हिरवा रंग) ११० पॅकेट १३.१४. V१ तंबाखू (हिरवा रंग) ११० पॅकेट किंमत रुपये ४,८४०/१५. सिल्व्हर रंगाचा ५०० ग्रॅम तंबाखू १२ पॅकेट किंमत रुपये ३०००/१६. रत्ना छाप तंबाखूची डब्बी २८ किंमत रुपये २,६६०/१७. विमल पान मसाला (६ पाऊच) ६० पॅकेट किंमत रुपये ६,४८०/V१ तंबाखू (६ पाऊच) ६० पॅकेट किंमत रुपये ७२०/- १८.१९. महिंद्रा पिकअप (एम एच १२ एस एफ ४०७०) चारचाकी वाहन जु.वा. कि. अ. ६,००,०००/-२०. टोयोटा इनोव्हा गाडी (एमएच २४व्ही १६४२) चारचाकी वाहन जु.वा. कि. अ. ५,००,०००/- असा एकूण किंमत रुपये १७,८२,२९७/- एवढा वरील वर्णनाचा व किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, पोलीस ठाणे धाराशिव शहर येथे आरोपीविरुद्ध अन्न व औषध प्रशासन कायदा तसेच अन्न सुरक्षेच्या संबंधित कलमांनुसार कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरील कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर मॅडम, मा. अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर साहेब, यांचे मार्गदर्शनाखाली परीक्षावधीन पोलीस उप अधीक्षक श्री. अमोल मोहिते साहेब, पोलीस निरीक्षक श्री. कुमार दराडे, पोउपनि अक्षय डिघोळे, सपोफौ / ३०० क-हाळे, पोअं/ १४५ जाधवर, चालक पोहेकॉ / ४५६ रणनवरे आणि पोअं/ १०४८ नाईकवाडी यांच्या पथकाने यशस्वतीरीत्या पार पाडली आहे.
