दर्पण न्यूज विटा प्रतिनिधी (शिराज शिकलगार):-सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहरातील विटा हे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने भक्तिमय वातावरणात सर्वत्रच विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.
यावेळी सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमाला कायमच वैभव दादा हे कार्यरत असतात, सामाजिक बांधिलकी म्हणून धार्मिक योग हे सुद्धा परंपरेचा योग आहे, प्रत्येक वर्षी अनेक धार्मिक कार्यक्रमात वैभव दादा कायमच अग्रेसर असतात, यावर्षी गुरु पौर्णिमेनिमित्त श्री रेवणसिद्ध पालखीचे विटा शहरातील स्त्री चौंडेश्वरी मंदिरात आगमन झाल्यानंतर, वैभव दादांनी श्री रेवणसिद्ध पालखीला खांदा देत सर्व भक्तजन भाविकांमध्ये तल्लीन होऊन आनंद सोहळा घेत, भाविकांच्या बरोबर गप्पा मारत, सर्व भाविकांच्या उपस्थित वैभव दादांनी श्री रेवणसिद्ध पालखीचे दर्शन घेतले, व सर्व भक्तजन भाविकांच्या बरोबर महाप्रसाद सोहळ्यास उपस्थित राहून महाप्रसादाचा स्वाद घेतला, यावेळी श्रींचे दर्शन घेत आशीर्वाद प्राप्त केले, यावेळी श्री अवधूत देशमुख यांनी विटा नगरीचे माजी नगराध्यक्ष भाजपचे युवा नेते ॲड श्री वैभव दादा पाटील यांचा सत्कार सोहळा केला , या वेळी याच वेळी वैभव दादांनी आलेल्या सर्व भक्तजन भाविकांच्या समस्या व अडचणी जाणून घेतल्या व त्या मार्गी लावू धार्मिक कामात मी कुठे कमी पडणार नाही असे म्हणत सर्व भक्तजन भाविकांना गुरुपौर्णिमेनिमित्त शुभेच्छा दिल्या.
