दर्पण न्यूज विटा प्रतिनिधी (शिराज शिकलगार):—सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यात स्व.अजितदादा पवार यांच्या ६७ व्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रात कामगिरी करणाऱ्यांचा क्रीडा सन्मान तसेच अन्य सन्मानित पुरस्कार प्रदान करण्यात आले, सविस्तर माहिती अशी की, तत्कालीन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्व, अजित दादा पवार यांच्या ६७ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सन्माननीय प्रदीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा सप्ताहांतर्गत आयोजित युवा संकल्प शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
क्रीडा सन्मानित करण्यात आले, संकल्प शिबिर व क्रीडा सन्मानाचे पुरस्काराचे वितरण पलूस येथे मोठ्या उत्साहात पार पडले, या मध्ये जनसेवा सप्ताहांतर्गत पुरस्कारांमध्ये विटा पोलीस ठाणे विटा वाहतूक नियंत्रण शाखेचे वाहतूक पोलीस श्री , अविनाश तानाजी लाड ( पलूस) यांना स्व, अजित (दादा) पवार यांच्या ६७ व्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताह स्व अजितदादा पवार युवा क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या वेळी नेते प्रदीप कदम म्हणाले, युवकांनी मोठी सपने पहावीत आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहावे व ती प्रत्यक्षात आणण्यासाठी कृती करावी, या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सन्माननीय राष्ट्रवादी काँग्रेस वक्ता प्रशिक्षण विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ,विशाल माने यांनी अनमोलाचे मार्गदर्शन केले तर अध्यक्षस्थीनी पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, प्रकाश पुदाले होते, या वेळी श्रेयस राजाराम साळुंखे,(पलूस) अथर्व कुमार मोरे, ( गोंदिलवाडी). रिया अजित भोसले( पलूस). अथर्व सतीश मिरजकर ( अंकलखोप). प्रेरणा सयाजी पाटील, ( देवराष्ट्रे). आणि पंकज पोपट जाधव ,( बुरुंगवाडी), तसेच विटा वाहतूक नियंत्रण शाखेचे वाहतूक पोलीस श्री अविनाश लाड ( कुंडल ). मिस्त्री अनिस असलम शिकलगार ( राहणार अंकलखोप ) या सर्व खेळाडूंना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्व, अजित ( दादा) पवार क्रीडा सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आले, या वेळी पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव धोंडीराम शिंदे, प्राचार्य विजयकुमार गायकवाड, रणजित शिंदे, अनिल पाटील,तोफिक मुल्ला, दौलतराव पाटील उपस्थित होते, वरील सर्व मान्यवरांचे व सन्मानित पुरस्कार यांचे स्वागत संजय शिंदे यांनी केले. राहूल पाटील यांनी सर्वांचेच आभार मानले.
