प्रत्येकाच्याच जीवनात एक ना एक मार्गदर्शक, गुरु असतोच असतो. तो कोणत्याही स्वरूपात असू शकतो. ज्याच्या कडून ज्ञान मिळते काहीतरी शिकायला मिळते तो गुरु. माझ्यावर पहिल्याापासून तथागत गौतम बुद्ध, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर,राजश्री शाहू महाराज, महात्मा जोतीराव फुले या महापुरुषांचा प्रभाव आहे. म्हणून या महापुरुषांना प्रथम मी गुरु मानतो. यामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वाचल्यानंतर स्वाभिमानाने जगून कोणत्याही परिस्थितीमध्ये शिका संघटीत व्हा, व संघर्ष करा हा कानमंत्र मी अंगीकारायचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. या महापुरुषांना अभिवादन करत असताना यांचा सच्चा अनुयायी बनण्याची पात्रता माझ्यामध्ये यावी हेच मी बोलत असतो. यासाठी माझा प्रयत्न असतो. यानंतर माझे आई-वडील ज्यांनी मला जन्म दिला व चांगले संस्कार केले त्यांमुळे मी आज जो आहे त्यांमध्ये माझ्याकडे जे चांगले गुण असतील ते या ते या माझ्या गुरुमुळे आणि अवगुण असतील ते माझे स्वतःचे , या गुरुपौर्णिमेनिमित्त या सर्वांना मी मनापासून वंदन करतो…
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर बालपण, तारुण्यपण, इत्यादी सर्वच ठिकाणी आपण प्रत्येक गोष्ट शिकत असतो. माझ्या आयुष्यात वरील सर्व महापुरुषांचा पगडा आहेच परंतु त्यांना प्रमाण मानून काही लोक, जगत,असतात यामध्ये यांचे विचार स्वतः अंगीकृत करून वाटचाल करत असतात. यामध्ये मी बारकाईने विचार करत असताना मला माझे गुरु, एक तरुण, उमदेनेतृत्व पलुस कडेगांव विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय व कर्तव्यदक्ष आमदार डॉ. विश्वजीत कदम साहेब हे दिसतात. मी आदरणीय बाळासाहेब यांना यासाठी गुरू मानतो कारण त्यांच्या मध्ये मला माझ्या सर्व गुरू चा विचार,कृतीत आणण्याची क्षमता आणि कृती करण्याचे धाडस त्यांच्यामध्येच दिसते., एक तरुण, उच्चविद्याविभुषित, चांगले संघटन कौशल्य असणारे कर्तृत्व,नेतृत्व आणि दातृत्व असणारे असेनेते आहेते . आणि समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन, मराठा, SC, ST, OBC, OBC मधील micro OBC, minority या सर्वांना सोबत घेऊन त्यांना न्याय देण्याची भूमिका त्यांची असते एवढेच नाही. केवळ भूमिकाच नाही तर तशी कृती करण्याची धमक या माझ्या नेत्तुत्वामध्ये आहे. आजवर महापुरुषांचे नावे घेणारे खूप पक्ष आणि खूप नेते पाहिले मात्र त्या महापुरुषांचे विचार स्वतः आत्मसात करून अनुकरण करणारे नेते म्हणजे mमाझे नेते आदरणीय डॉ विश्वजीत कदम साहेब. त्यांचे सोबत युवक काँग्रेस मध्ये काम करण्याची संधी मला मिळाली मला आठवत बाळासाहेब हे युवक काँग्रेसचे अध्यक्ष असताना सुरुवातीला एक वेळ मला त्यांच्या बद्दल काय-काय वाटते,त्याचे योग्य असणारे मुद्दे, काही मला न पटलेले मुद्दे असे जवळ जवळ साडेतीन ते चार तास बसून मी त्यांना सात पानी पत्रे लिहिले.त्यामुळे त्यांच्याबद्दल काही चांगले काही मला न पटलेले मुद्दे असे परखड लिहिले होते. माझी कौटुंबिक पार्श्वभूमी पाहिली तर माझे आजोबा धोंडीराम गोतपागर , वडील भूपाल गोतपगार आणि आता मी आंबेडकरी चळवळीचे घराणे RPI व काँग्रेस आघाडीपासून डॉ.पतंगराव कदम साहेब यांच्याशी व कदम कुटुंब, महेंद्र आप्पा लाड यांचे कुटुंब यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध त्यामुळे मी बाळासाहेबांबद्दल लिहू शकलो .लिहिल्यानंतर बाळासाहेब हे कुंडल मधील अष्टेश्वर मंगल कार्यालयात लग्नासाठी आले होते त्यावेळी मी त्यांना भेटलो. त्यांना म्हणालो बाळासाहेब, मी हे पत्र आपल्यासाठी लिहिले आहे, यामध्ये मी त्रयस्त आणि मुक्तपणे तुमच्या बद्दल चांगले आणि वाईट लिहिले आहे. मी हे ४ तास बसून लिहिले ७ पाने आहेत हे लाखोट्यात घातले आहे, हे कोणाकडे देऊ? PA च्या कडे देवू की तुमच्या कडे? त्यावेळी माझ्याकडे बघितले व हसले आणि माझाकडे दे म्हणाले, मी त्यांना दिले. बाळासाहेब म्हणाले पुण्याला निघालोय गाडीत वाचतो.त्यानंतर बऱ्याच गोष्टी घडत गेल्या मला बाळासाहेबांनी पुण्याला बोलवले भेट झाली मला एके दिवशी पलुसच्या लक्ष्मी लॉन येथे लग्नाला मी येणार आहे तू तिथे ये म्हणाले . संध्याकाळी मी तिथे गेलो. लग्न लागल्यानंतर मी आणि माझे वडील टू व्हीलर वरून गेलो होतो मला पाहताच बाळासाहेब म्हणाले सुशील तू गाडीमध्ये बस हे ऐकून मला काही कळेना, सर्व लोक बघत होते लग्नाला खासदार, आमदार, जिल्ह्यातील व तालुक्यातील नेते एकत्र बाहेर पडत होते. मी गाडीत बसलो सायंकाळी ६.३० वाजले होते .गाडीमध्ये बाळासाहेब, त्यांचे PA सचिन सावंत सर आणि मी एवढेच .गाडीतून जाताना बलवडी फाटा येथे स्व.भारतीताईनी बाळासाहेबांना जेवणाचा डबा पाठवला होता. तो गाडीत घेतला. नंतर प्रवास सुरू झाला. पलुस परत कडेगांव तालुक्यात गावागावात साहेबांचे कार्यक्रम बैठका होत होत्या मला ते विचारत होते हा बोल तुला काय वाटत? समाजकारण,राजकारण,आपल्या मतदारसंघाबद्दल, मला थोडे कळेना काय बोलू,तुला जे वाटत ते मुक्त पणे बोल मी पत्र दिले होते त्या अनुसरे मी खूप काही बोलो. ती चर्चा,कार्यक्रम दौरे यानंतर कधी रात्री २.३० वाजले कळले नाही त्यावेळी बाळासाहेब मला म्हणाले तुझा समाजकारण आणि राजकारण याचा अभ्यास चांगला आहे,त्यांनी युवक काँग्रेस तत्कालीन अध्यक्ष यांना सांगितले सुशील ला सांगली जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस पदाचे नियुक्ती पत्र द्या रात्री ३.३० वाजता मी कुंडल ला पोहचलो. त्यानंतर बाळासाहेब यांनी आमचे मार्गदर्शक नेते मा.महेंद्र आप्पा लाड यांनाही विचारून माझी माहिती घेतली आदरणीय आप्पांनी माझी निवड करा असे सांगितले. तो आपलाच आहे असे सांगितले. दुसऱ्या दिवशी मला इंद्रजीत साळुंखे यांचा फोन आला डॉ. सुशिल गोतपागर बाळासाहेब यांच्या आदेशान्वये तुम्हाला नियुक्ती पत्र देणे आहे आपण कडेगांव किंवा सांगली कुठे येताय.?मी कडेगांव म्हणालो. कडेगांव ला गेलो आणि सरचिटणीस पदाचे नियुक्तीपत्र घेतले. साहेबांचे आभार मानले साहेबांनी शाबासकी दिली आणि कामाला लाग म्हणाले. त्यानंतर मी त्यांच्या फॅन झालो कारण मी काय काय बोललो त्याचबद्दल की लिहल हे त्यांना आणि मला माहित या पुरोगामी नाही तर खऱ्या खूऱ्या पुरोगामी युवा नेत्याने माझे ऐकून घेऊन माझी पारख केली आणि मला संधी दिली. त्यानंतर सातत्याने मी सामाजिक, राजकीय काम चांगल्या पद्धतीने करत आलो काही महिन्यांनी युवक काँग्रेस चे इलेक्शन लागले यामध्ये साहेबांनी मला जिल्हा-उपाअध्यक्ष बनवले आणि माझ्या कामाची पोचपावती दिली. यानंतर मी काम करत असतांना माझे काँग्रेस पक्ष, महापुरुषांचे विचार ,बाळासाहेब यांचे व्हिजन हे युवकांमध्ये तळागाळात पोहचवत् राहिlलो. २ वर्षानी सांगली जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री आ नितीन राऊत यांचा जिल्हा दौरा होता.मी त्या दौऱ्यात होतो त्यावेळी बाळासाहेबांनी sc dept. च्या जिल्हा अध्यक्षपदासाठी माझी शिफारस केली. मी साहेबांना बोललो साहेब माझ्या कडे युवक काँग्रेसचे उपअध्यक्ष पद आहे. व मी प्रवक्ता सुधा आहे. तरीही बाळासाहेब व नितीन राऊत साहेब म्हणाले तुमच्या सारख्या सुशिक्षित तरुणाची या पदाला गरज आहे. मी आदरणीय साहेब व बाळासाहेब यांच्या मार्गदर्शनाने संघटना बांधणीचे,सामाजिक, उपक्रम, महापुरूष जयंती,पुण्यतिथी सामान्यांचे प्रश्न घेऊन आंदोलण,मोर्चे,निवेदन हे कार्यक्रम सुरूच ठेवले.प्रत्येक भेटीत साहेब मला म्हणायचे काय सुशील ?काम सुरू ठेव .मुंबई तीलक भवन येथे एका मीटिंग मध्ये माझे सोलापूर चे मित्र गौरव खरात यांनी मला सांगितले युवक काँग्रेस पुढच्या निवडणूक लागल्या ,बाळासाहेबांना भेट तुमचा नंबर लागेल ,मला काही कळेना नंतर इलेक्शन लागले फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस उद्या होता आम्ही सर्व जुनी टीम आदरणीय महेंद्र आप्पा लाड यांना भेटलो आप्पा म्हणाले जून्या सर्वांनी फॉर्म भरा, बाळासाहेबांचा काय निरोप येतोय बघूया .मी भेटून रात्री कुंडल स्टँडवर उभा होतो 8.30 वाजले होते एक फोन करूया असे वाटले. साहेबांना फोन केला त्यांनी उचलला नाही, अजून एक वेळा केला. पण उत्तर नाही, १५ मिनिटांनी साहेबांचा फोन आला बोल सुशील काय म्हणतोय, साहेब उद्या अर्ज भरायचा शेवटचा दिवस आहे. आपला काही निरोप नाही. आप्पांना आम्ही सर्व भेटलो त्यांनी अर्ज भरायचे सांगितले. पण मी कोणत्या पदासाठी अर्ज भरू? आपण सांगितल तर बरे होईल का भरायचा नाही?
बाळासाहेबांनी सांगितले, “सुशील तू सांगली जिल्हा युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष पदासाठी अर्ज भर. बाकीचे मी नंतर तुला बोलतो. मला काही कळेनाच. पण मनातून आनंद झाला होता. परत मी आप्पांच्या कडे गेलो त्यांना सांगितले. आप्पा म्हणाले मग चांगले झाले. मी, जिल्हाध्यक्ष पदाचा अर्ज भरला ,माझ्या सोबत प्रदेश साठी सुधीर भैया जाधव ,विधानसभा अध्यक्ष साठी प्रमोद जाधव आणि इतर सर्वांनी अर्ज भरले . कामाला लागलो. दुधोंडीचे नेते मा. जे. के बापू जाधव यांचा मला फोन आला अरे सुशील, तू सुधीर, प्रमोद जरा जिल्हा फिरा आदरणीय बाळासाहेब व आदरणीय आप्पा व बापूना सांगून आम्ही पूर्ण जिल्हा तालुका युवक काँग्रेस प्रचारासाठी फिरलो आणि महाराष्ट्रात एक नंबर ला ३३००० मते घेऊन मी सांगली जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष झालो. साहेबांनी, आप्पांनी, बापूंनी , जितेश भैया , ऋषीकेश दादा सह जिल्ह्यातील सर्व नेत्यांनी आमचे सर्वांचे अभिनंदन केले.
त्यानंतर आम्ही आंदोलने ,सामाजिक उपक्रम चालू ठेवले. बाळासाहेबांचे बारीक नजर होती माझ्यावर .मी तर टिळक भवन मुंबई, दिल्ली येथील मीटिंग त्यामध्ये ३-४ मिनिटे भाषण करत होतो मत मांडत होतो , ते बाळासाहेबांना पाठवत होतो . ते स्वतः साहेब बघत होते. माझे वडील बाळासाहेबांना कधी कधी कुंडल, कि.वाडी, पलुस येथे भेटत असत त्यावेळी बाळासाहेब नेहमी त्यांना सांगत,सुशील हुशार आहे. चांगलं काम करतोय , माझ लक्ष आहे त्याच्यावर. हे ऐकल्यावर माझे वडील खुष व्हायचे एवढा मोठा नेता तुझ्याबद्दल चांगलं बोलतोय, हे लक्षात ठेव. माझे वडील नेहमी सांगायचे ‘सुशील, हा प्रामाणिकपणा ,तीन पिढ्यांची निष्ठा, आणि तुझं कर्तृत्व याच फळ आहे. बाळासाहेबांना कधी सोडायचं नाही, हे मी तंतोतंत पाळले. त्यांचे काम जवळून पाहिल्यानंतर गुरू असावा तर असाच बाळासाहेबांना मी सर्वार्थाने गुरु मानतो. त्यांच्या सोबत काम करत असताना त्यांच्यासोबत भावनिक नाते निर्माण झाले.. मी मध्येच कधीतरी त्यांना विचारत असतो साहेब मी योग्य रीतीने चाललोय ना? ते म्हणत अयोग्य असते तर मी गप्प बसणार आहे का? त्यांच्याकडून मला खुप काही शिकायला मिळाले. सर्वांना सोबत घेणे, सर्वांना चांगले आहे त्याला चांगले म्हणायची दानत त्याच्यामध्ये आहे आणि वाईट गोष्टीला विरोध करणे.काहीही संकटे आली तरी त्याला न घाबरणारे. महाराष्ट्रात एवढी राजकीय उलथापालट झाली खूप त्रास बाळासाहेबांना झाला तरी ते डगमगले नाहीत.आपल्या काँग्रेस पक्षावर,आपल्या नेत्यावर वर ,आणि पुरोगामी महाराष्ट्राच्या विचारावर ठाम राहून ते काम करतात. सर्वांशी वैयक्तिक संबंध चांगले ठेवतात,मात्र विचारसरणीशी तडजोड न करणे म्हणूनच बाळासाहेब मला माझे गुरु म्हणून खूप भावतात. शिर्डी मध्ये एक काँग्रेस पक्षाचे SC विभागाचे ३ दिवसाचे शिबीर होते त्यामध्ये दिल्लीतले राहुल गांधी,यांचे निकटवर्तीय के राजू, माजी मंत्री राजेंद्र गौतम तसेच राज्यातील सर्व मोठे नेते उपस्थित होते. आदरणीय बाळासाहेब ही होते. सर्व महाराष्ट्रातून लोक,कार्यकर्ते नेते आले होते. शिबीरात बाळासाहेब भाषण करत असताना त्यांनी सांगितले की “मैं गर्व से कहूंगा, मेरे डिस्ट्रीक्ट का युवा काँग्रेस का अध्यक्ष एक SC कम्युनिटी का पडा हुआ लडका है, और वो डॉक्टर है उसे भी हम ऐसी ताकद देगे की ओ पुरे जिल्हेमे जाके काँग्रेस पार्टी की और परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर व्की विचारधारा का प्रचार और प्रसार करे. हे मी ऐकताना आपसुकच माझ्या डोळ्यातून पाणी आले. श्रीरामपूरचे आमदार मा. हेमंत ओगले यांनी मला उभे राहण्यास सांगितले मी उभा राहिलो हजारो कार्यकर्ते बघत राहिले आणि माझ्या डोळ्यातून पाणी येत होते. मनात असा विचार येत होता की हा नेता जो सर्वांच्या समोर राज्याच्या समोर दिलखुलासपणे आपल्या कार्यकर्त्याची प्रशंसा करतोय हे ऐकून खूप आत्मिक समाधान मिळाले. आणि बाळासाहेबांबद्दल माझ्या गुरुबद्दल खूप आदर वाढला आणि खूप अभिमान वाटू लागला. असा आपला गुरू आहे. बाळासाहेबांच्या मुळेच पक्षाच्या कार्यक्रमात मला दिल्ली, मुंबई, पुणे, नागपूर सर्वच ठिकाणी जाण्याची नेहमी संधी मिळाली.iमी ही त्यांच्या नावाला धक्का लागेल असे कधीच वागलो नाही. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यासोबत इतर राज्यांतील लोक कार्यकर्ते नेते कर्नाटक, तेलंगणा, पंजाब, हरियाणा, गोवा, केरळ, राजस्थान, आसाम, MP, UP, सर्वच राज्यात त्यांना माननारे कार्यकर्ते नेते आहेत आणि ते सर्व स्तरातील आहेत याचा मला खूप अभिमान आहे. भारत जोडो यात्रे दरम्यान हिंगोली मध्ये आदरणीय बाळासाहेबांनी माझी देशाचे नेते राहुलजी गांधी यांची भेट घडवून दिली,आणि जिल्हा युवक काँग्रेसचा अध्यक्ष आहे,पुरोगामी विचाराचा आहे. असे सांगितले. माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या दलित, समाजातील (बौद्ध)मागासवर्गीय कार्यकर्त्याला देशाचे नेते असणारे खा राहुलजी गांधी यांची भेट घडवून देणारे नेते माझे गुरू आदरणीय बाळासाहेब आहेत. यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले, मिळत आहे खूप प्रसंग आहेत अजून सांगण्याचे राजकारणात, समाजकारणात विचारधारा पक्की असलेले ,निष्ठा असलेले , प्रामाणिकपणा असलेले असे खूप कमी लोक राहिलेले आहेत यां देशात आणि राज्यात त्याचपैकी महत्वाचंे नेते म्हणजे बाळासाहेब ,ते एक दिवस या राज्याचे नेतृत्त्व नक्की करतील यात शंका नाही..म्हणूनच मला बाळासाहेब माझे गुरू म्हणून फार आवडतात. दिवस होता ११ जून २०२३. साहेब म्हणजे बाळासाहेब मंत्री होते. मला युवक काँग्रेस च्या काही निवडी करायच्या होत्या. मी ४-५ दिवसांपासून साहेब कधी येणार आहेत याची माहिती घेत होतो. ११ जून २०२३ रोजी साहेब वसगडे येथे जैन बांधवांच्या मंदिराचे भूमिपूजन करण्यासाठी आले होते. मी ही माझ्या ४-५ कार्यकर्त्यांसह वसगडे मध्ये पोहोचलो. कार्यक्रमानंतर मी साहेबांना बोललो मला काही निवडी करायच्या आहेत. आपली अनुमती हवी आहे. आपण याच्यावर नजर टाकावी व मार्गदर्शन करावे ही विनंती. साहेब म्हणाले तु गाडीत बस. मी माझ्या सहकाऱ्यांना सागितलं तुम्ही आपल्या गाडीतून या मी तुम्हाला कळवतो मी कुठे असेन ते. मी गाडीत बसलो गाडी वसगड्यातून पाचव्यामैलवरून भिलवडी मार्गे आष्टा मार्गे कोल्हापूरकडे वळाल्या साहेब फोनवर व्यस्त असल्यामुळे माझे त्यांच्याशी बोलणे होत नव्हते. थोडे बोलण होत होते काय चाललंय,काम कसे चाललंय ते विचारत होते नंतर लगेच फोन येत होते. त्यामुळे बोलणे पूर्ण होत नव्हते. मी कोल्हापूरला पोहोचल्यावर साहेबांच्या पुढे ५ लोकांची यादी ठेवली. साहेबांनी ती वाचली आणि आपण बोलू म्हणाले. नंतर थोड्यावेळानी त्यांनी विचारले बोल .. त्या ५ ही लोकांची त्यांची पार्श्वभूमी,सद्यस्थिती परिस्थिती सांगितली. त्यांनी मला त्याच्या विषयी संपूर्ण माहिती विचारली आणि म्हणाले यात 1 Open, 2 OBC, 1 Muslim, 1 SC, अशी यादी होती. सुशील आपण सर्व समाजातील तरुणांना संधी द्यायची आहे Good.यांच्या नियुक्ती पत्र देऊन टाक . आपल्याला सर्वांना सोबत घेऊन पुढे जायचं आहे. तोपर्यंत गाडी कोल्हापूरतील एका मोठ्या मंगल कार्यालयासमोर गाडी थांबली. साहेब उतरले मी ही उतरलो साहेबांनी वधू वराना शुभेच्छा दिल्या त्यावेळी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पक्षाचे नेते, मंत्री, आमदार, खासदार उपस्थित होते. साहेबांना जेवणासाठी लग्नमालक नेत असताना मी ही तेथेच होतो साहेबांनी मला सोबत जेवण करण्यास सांगितले. तेवढ्यात तिथे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील साहेब आले.ते ही आमच्यासोबत जेवायला बसले. जेवण झाले नंतर साहेबांना बाहेर पडताना लोकं भेटत होते. साहेब गाडीजवळ आल्यावर मला म्हणाले सुशिल जेवलास ना व्यवस्थित ?चल गाडीत बस मी ही गाडीत बसलो, गाडी कोल्हापूर एअरपोर्टकडे निघाली.एअरपोर्टला पोहोचलो.आत गेलो. मला काही कळेना मला वाटले साहेबांचे काहीतरी नियोजन असेल. तेवढ्यात तिथे एक हेलिकॉप्टर साहेबांची वाट बघत होते. साहेबांनी आत जाताना चल सुशील लवकर म्हणाले, मला आश्चर्याचा धक्काच बसला. मी ही साहेबांबरोबर हेलिकॉप्टर मध्ये बसलो. बाळासाहेब,मी, सचिन सर PA, सचिन दादा अंगरखक्षक आम्ही चौघेच हेलिकॉप्टर मध्ये आणि कॅप्टन .. आणि चालू झाला आमचा हेलिकॉप्टर प्रवास… माझ्या आयुष्यातील हेलिकॉप्टरने पहिलाच प्रवास माझ्या नेत्याने माझा गुरूने दिलेली एक अविस्मरणीय क्षण होता. कोल्हापूरवरून आम्ही पलुसच्या दिशेने येत असताना वरून आपला गाव कसा दिसतो, कृष्णा नदी, शेती सर्व काही विलक्षण अनुभव होता . मी साहेबांना विचारले, “साहेब एक फोटो घेऊ का?” त्यांनी स्मित केले, मी लगेच म्हणालो मी Viral नाही करणार परत हसले आणि हो म्हणाले. मी साहेबांचा, हेलिकॉप्टर मधला फोटो, Video काढला. खूप छान वाटत होते. मनात खूप विचार येत होते हे साहेब आपल्या सारख्या मागासवर्गीय समाजातील कार्यकर्त्यांना एवढा जीव लावतात मान-सन्मान देतात, एका मंत्र्यासोबत हेलिकॉप्टर ने प्रवास मी कधी विचार केला नव्हता, साहेब काय आहेत हे मला अजून कळले.आम्ही पलुसला सूतगिरणीवर आलो त्यावेळी तालुक्यातील जिल्ह्यातील खूप नेते,कार्यकर्ते साहेबांना भेटण्यासाठी आले होते. आम्ही उतरलो साहेब त्यांना भेटले,नंतर लगेच गाडीत बसून मलाही घेऊन ताकारीच्या एका लग्नाला गेलो . त्यानंतर मी साहेबांना म्हणालो, “साहेब मी इथे थांबतो. कारण इतर लोक भेटणार होते त्यातील एकाला साहेबांचे गाडीत बसवायचे होते.” साहेब म्हणाले, “ठीक आहे, नियुक्ती करून घे.” मी धन्यवाद साहेब म्हणालो . बाळासाहेब हे माझे सर्वार्थाने गुरु आहेत असे मी उगाच म्हणत नाही. साहेब सर्वगुण संपन्न नेतृत्व आहेत. म्हणूनच ते हजारो -लाखो तरुणांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत.आदरणीय बाळासाहेब आपणास गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
आपले आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहवेत ही विनंती. आपला आज्ञाधारक शिष्य.
डॉ सुशील भूपाल गोतपागर ,कुंडल
अध्यक्ष , सांगली जिल्हा युवक काँग्रेस
