दर्पण न्यूज विटा -खानापूर तालुका प्रतिनिधी ( शिराज शिकलगार) :- रोशन ए आलम शिक्षण संस्था संचलित राहमत अंगलो उर्दू हायस्कूल मध्ये *सायबर कॅफे आणि अमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम संपन्न झाली.
या कार्यक्रमाची सुरुवात रहमत अंगलो उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक यांच्या प्रस्ताविकाने झाली आपल्या प्रस्ताविक परभाषणात मोमीन खलील अहमद सरांनी विटा पोलीस स्टेशनचे *पोलीस उपनिरीक्षक कणसे साहेब आणि माननीय श्री गडदे साहेब गोपनीय अन्वेषण विभाग* प्रमुख यांचा आदर सत्कार केला यावेळी विटा पोलीस स्टेशनचे कणसे साहेब यांनी *सायबर गुन्हे म्हणजे काय या गुन्ह्यामध्ये अनेक जण कसे बळी पडतात हे* सविस्तर समजून देताना आपण यापासून कसे वाचले पाहिजे यूपीआय नंबर आणि ओटीपी कोणालाही देऊ नये दिले तर आपले बँक अकाउंट कसे रिकामे होते हे पटवून दिले तसेच गोपनीय अन्वेषण विभाग प्रमुख गडदे साहेबांनी ही मोबाईलचा वापर कसा करावा मोबाईलचे होणारे दुष्परिणाम याविषयी इतंबूत माहिती करून दिली अमली पदार्थाचे सेवन करू नये ते आपल्या आरोग्यास कसे घातक असते हे विद्यार्थ्यांना योग्यरीत्या समजून दिले यावेळी रहमत अँग्लो उर्दू हायस्कूल चे शिक्षिका सौ मोमीन मॅडम कुमारी नया घर मॅडम श्री सत्तार सर श्री आंबी सर श्री गुफरान श्री मुजमेल उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता श्री मुल्ला सरांच्या आभार प्रदर्शनाने झाली.
