दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुने) -:
कळंब पोलीस ठाणे: मयत नामे-लक्ष्मण अर्जुन कोरे, रा. हावरगाव ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.10.07.2026 रोजी 03.00 ते 06.00 वा. सु. हावरगाव शिवारातील शेत गट नं 10 मधील लिंबाच्या गळफास घेवून आत्महत्या केली. आरोपी नामे-गुलचंद सुखदेव कोल्हे, छाया गुलचंद कोल्हे रा. हावरगाव ता. कळंब जि. धाराशिव यांनी व्याजाचे पैश्याचे वसुलीवरुन मानसिक त्रास दिल्याने त्यांचे त्रासाला कंटाळुन मयत लक्ष्मण याने आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-ज्ञानेश्वरी लक्ष्मण कोरे, वय 23 वर्षे, रा. हावरगाव ता.कळंब जि. धाराशिव यांनी दि.10.07.2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं.कलम-108, 115(2) 352, 3(5), अन्वये गुन्हा नोंदवला आहे.