दर्पण न्यूज धाराशिव (संतोष खुने) :-
धाराशिव, दि. ११ जुलै : अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात २८ जुलै २०२६ रोजी धाराशिव येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य संविधान बचाव मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीने मोर्चाच्या व्यापक नियोजनाला वेग दिला असून, तालुका समितीसह विविध नियोजन समित्यांची घोषणा करण्यात आली आहे.
धाराशिव येथील शासकीय विश्रामगृहात आरक्षण उप वर्गीकरण विरोधी कृती समितीचे राजाभाऊ ओव्हाळ व मार्गदर्शक धनंजय (नाना) शिंगाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत मोर्चाचे नियोजन, जनजागृती अभियान, गावनिहाय संपर्क, वाहतूक व्यवस्था, स्वयंसेवकांचे नियोजन, महिला व युवकांचा सक्रिय सहभाग तसेच मोर्चा शांततापूर्ण, शिस्तबद्ध आणि ऐतिहासिक स्वरूपात पार पाडण्यासाठी आवश्यक बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
मोर्चाच्या यशस्वी आयोजनासाठी तालुक्यातील आंबेडकरी कार्यकर्ते, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि समविचारी नागरिकांवर विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या.
तालुका समिती सदस्य : भाई फुलचंद गायकवाड, पुष्पराज माळाळे, राजाभाऊ राऊत, सुनील वाघमारे, बालाजी माने, अप्पासाहेब घावारे, विशाल शिंगाडे, संपत्त जानराव, भालचंद्र कटारे, बापूराव गायकवाड, धनंजय वाघमारे, यशपाल गायकवाड, संतोष खुने, आप्पा कांबळे, संतराम अंकुश, मारुती अंकुश, सुमेध वाघमारे, समाधान सरवदे, संपत सरवदे, तुकाराम गवळी, उमेश शिंदे, पंकज शिंदे, तानाजी शिंदे, आप्पा मस्के, प्रमोद राऊत, राजाभाऊ हुंबे, सोमनाथ गायकवाड, तेजस भालेराव, संजय घनघावे, संदीप अंकुशराव, सुरज भालेराव, किरण आवटे आदींचा समावेश करण्यात आला आहे.
मोर्चासाठी पुढील समित्यांची घोषणा करण्यात आली :
स्टेज समिती : पुष्पराज माळाळे
पोस्टर, बॅनर व निवेदन समिती : राजाभाऊ ओव्हाळ, धनंजय शिंगाडे, कैलास शिंदे, अनिल हजारे, संजय बनसोडे
पाणी व्यवस्थापन समिती : विशाल शिंगाडे
वाहतूक (वाहन नियोजन) समिती : बाळासाहेब माने
झेंडा, टोपी व बॅच समिती : कुंदन वाघमारे
संरक्षक समिती : समता सैनिक दल, विकास बनसोडे, धनंजय वाघमारे
महिला समिती : राज्यश्री कदम, विजयामाला धावारे
प्रसिद्धी प्रमुख : मल्लिकार्जुन सोनवणे, शितल शिंदे, सचिन वाघमारे, कुंदन शिंदे, किरण कांबळे, शिवाशंकर वाघमारे, विजय बनसोडे
विशेष सहकार्य : अनुसूचित महिला बचत गट, वकील संघटना व ॲड. अनिरुद्ध नागटिळक.
बैठकीत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये जनजागृती सभा, कोपरा बैठका, प्रचार साहित्याचे वितरण, घरभेट मोहिमा राबविणे तसेच गावागावातून मोठ्या संख्येने नागरिकांना मोर्चात सहभागी करून घेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
यावेळी समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले की, अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण हे सामाजिक न्याय, समता आणि भारतीय संविधानाच्या मूलभूत तत्त्वांवर आघात करणारे पाऊल असून, संविधानाने बहाल केलेल्या आरक्षणाच्या घटनात्मक हक्कांचे संरक्षण करण्यासाठी हा लढा निर्णायक स्वरूपाचा आहे. संविधान, सामाजिक न्याय आणि समतेच्या रक्षणासाठी २८ जुलैचा संविधान बचाव मोर्चा ऐतिहासिक ठरेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
तसेच आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीने जिल्ह्यातील सर्व आंबेडकरी, सामाजिक व पुरोगामी संघटना, विद्यार्थी, महिला, युवक, कामगार, कर्मचारी तसेच संविधानप्रेमी नागरिकांना २८ जुलै २०२६ रोजी धाराशिव येथे होणाऱ्या भव्य संविधान बचाव मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होऊन संविधान आणि आरक्षणाच्या संरक्षणाच्या लढ्याला बळ द्यावे, असे जाहीर आवाहन केले आहे.