


दर्पण न्यूज मिरज :- बेळंकी, ता. मिरज येथे आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या अथक प्रयत्नातून साकार झालेल्या ग्रामीण रुग्णालयाचे लोकार्पण राज्याच्या महिला व बालविकास राज्यमंत्री . ना. श्रीमती मेघनाताई बोर्डीकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती बानू जमादार यांची उपस्थिती होती.
या ग्रामीण रुग्णालयामुळे बेळंकी व परिसरातील नागरिकांना दर्जेदार व तातडीच्या आरोग्यसेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार असून, ग्रामीण भागाच्या आरोग्य सुविधांना नवी दिशा मिळणार आहे.
याप्रसंगी सुमनताई खाडे, महिला व बालकल्याण सभापती बानू जमादार,.जयश्री वाहिनी पाटील,स्वातीताई खाडे, भाजपचे पदाधिकारी फारुख जमादार, डॉ. महेशकुमार कांबळे, काकासाहेब धामणे यांच्या सह नगरसेवक, जि. प. सदस्य, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.