दर्पण न्यूज विटा -खानापूर तालुका प्रतिनिधी (शिराज शिकलगार):- लोकनेते मा. हणमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचालित आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड रिसर्च सेंटर विटा ने चालू शैक्षणिक वर्षामध्ये सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागामधील सर्वाधिक प्लेसमेंट देणारे महाविद्यालय म्हणून नावलौकिक मिळालेला आहे. याचाच परिपाक म्हणून महाविद्यालयातील २४ विद्यार्थ्यांची ऑटो क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या पियाजिओ वेहिकल्स प्रायव्हेट लिमिटेड बारामती या कंपनीमध्ये निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. पी. एस. पाटील यांनी दिली.
चार वर्षांमध्ये १००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळाली आहे.
नव-नवीन क्रियाशील उपक्रम राबवण्यासाठी आदर्श अभियांत्रिकी महाविद्यालय नेहमीच अग्रेसर असते. विद्यार्थी निवडीची प्रक्रिया ही प्रोग्रॅमिंग टेस्ट, टेक्निकल इंटरव्यू व पर्सनल इंटरव्यू या तीन स्तरावर मूल्यमापन करून झाली. प्रक्रियेत पदविका इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन विभागातील ४, मेकॅनिकल विभागामधील ३, इलेक्ट्रिकल विभागातील २ व पदवी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन विभागातील ६, मेकॅनिकल विभागामधील २, इलेक्ट्रिकल व कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ७ असे एकूण २४ विद्यार्थी यशस्वी झाले.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक २.४ ते ३.६ लाखांपर्यंत वेतन कंपनीतर्फे देण्यात येणार आहे. सर्व क्षेत्रात यशस्वी असणारे उत्कृष्ट विद्यार्थी घडविण्यासाठी आदर्श अभियांत्रिकी महाविद्यालयाचा लौकिक आहे. विविध कार्यशाळांचे महाविद्यालयामार्फत आयोजन करण्यात येत असल्याची माहिती ट्रेनिंग प्लेसमेंट अधिकारी प्रा. स्वप्नील जाधव यांनी दिली.
या यशात रजिस्ट्रार श्री. अजितसिंह चव्हाण, आय क्यू सी हेड डॉ. ए. आर. निचळ, डिप्लोमा डिन प्रा. ए. बी. साळुंखे व सर्व विभागप्रमुख, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे संस्थेचे संस्थापक अँड सदाशिवराव भाऊ पाटील अध्यक्ष अँड वैभव दादा पाटील यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी कार्यकारी संचालक मा. पी. टी. पाटील, संचालिका मा. पुजा पाटील वित्त संचालक मा. रविराज सूर्यवंशी यांनी ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन व सत्कार करून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.