दर्पण न्यूज विटा -खानापूर तालुका प्रतिनिधी (शिराज शिकलगार) :-राज्यातील अभियांत्रिकीच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया (CAP) अंतर्गत आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर, विटा येथे शासनमान्य स्क्रूटनी सेंटर कार्यरत झाले असून प्रवेश नोंदणी प्रक्रियेला उत्साहात सुरुवात झाली आहे. या केंद्रामुळे खानापूर, आटपाडी, कडेगाव, तासगाव, पलूस, ताकारी तसेच माण-खटाव व म्हसवड परिसरातील विद्यार्थ्यांना प्रवेश नोंदणी, कागदपत्रे पडताळणी आणि प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होत आहेत.
अभियांत्रिकी प्रवेशासाठी अर्ज भरणे, ऑनलाइन नोंदणी, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी, अर्जातील त्रुटींची पूर्तता, प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर मार्गदर्शन तसेच विद्यार्थी व पालकांचे समुपदेशन अशा सर्व सुविधा या शासनमान्य स्क्रूटनी सेंटरमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अनुभवी प्राध्यापक व प्रशिक्षित कर्मचारी विद्यार्थ्यांना प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करत असल्याने प्रवेश प्रक्रिया अधिक सुलभ व पारदर्शक होत आहे.
स्क्रूटनी सेंटर प्रमुख प्रा. प्रदीप शिंदे व प्रा. सागर माळी यांनी विद्यार्थ्यांना आवाहन करताना सांगितले की, “अभियांत्रिकी शिक्षणाची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेची अंतिम मुदत लक्षात घेऊन वेळेत नोंदणी करावी. सर्व आवश्यक कागदपत्रांसह स्क्रूटनी सेंटरला भेट दिल्यास प्रवेश प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यावर योग्य मार्गदर्शन व सहकार्य दिले जाईल. विद्यार्थ्यांनी या शासनमान्य सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.”
महाविद्यालयाचे रजिस्ट्रार अजित चव्हाण, प्राचार्य डॉ. पी. एस. पाटील, संचालिका पूजा पाटील, कार्यकारी संचालक पी. टी. पाटील, आर्थिक संचालक रविराज सूर्यवंशी, अध्यक्ष वैभव पाटील यांनीही परिसरातील सर्व विद्यार्थी व पालकांना या शासनमान्य स्क्रूटनी सेंटरचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. विद्यार्थ्यांनी अंतिम क्षणाची वाट न पाहता लवकरात लवकर प्रवेश नोंदणी पूर्ण करून तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे, असे त्यांनी नमूद केले.
आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटरमध्ये आधुनिक पायाभूत सुविधा, अनुभवी प्राध्यापक, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विद्यार्थी-केंद्रित शैक्षणिक वातावरण उपलब्ध आहे. यासोबतच प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांना योग्य समुपदेशन व मार्गदर्शन मिळत असल्याने परिसरातील विद्यार्थी व पालकांकडून या स्क्रूटनी सेंटरला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
परिसरातील सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी आवश्यक मूळ कागदपत्रांसह आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर, विटा येथील शासनमान्य स्क्रूटनी सेंटरला भेट देऊन अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालय प्रशासनाने केले आहे.