दर्पण न्यूज पलूस भिलवडी :- मोबाईलच्या आजच्या जमान्यात पालकांनी जाणीवपूर्वक पाल्यांवर सुसंस्कार करण्याची गरज आहे. भिलवडीचे संस्कार केंद्र गेली 25 वर्षे हेच संस्काराचे कार्य करीत आहे. त्यामुळे हे संस्कार केंद्र कृष्णा काठचे खरेखुरे भूषण आहे , असे मत श्रीमती सुनिता चितळे वहिनी यांनी भिलवडी येथे व्यक्त केले. त्या भिलवडीचा साने गुरुजी संस्कार केंद्राच्या 26 व्या वर्धापन दिन समारंभात अध्यक्ष म्हणून बोलत होत्या.
प्रारंभी केंद्राचे केंद्रप्रमुख प्रसिद्ध साहित्यिक सुभाष कवडे यांनी सर्वांचे स्वागत व प्रास्ताविक केले. प्रास्ताविकामध्ये श्रीयुत कवडे यांनी गेल्या 25 वर्षाच्या वाचनातून सुसंस्कार या ध्येयाने कार्यरत असणाऱ्या साने गुरुजी संस्कार केंद्राच्या वाटचालीचा व विविध उपक्रमांचा आढावा विस्ताराने सादर केला. यावेळी श्यामची आई पुस्तकातील काही सुविचार संयुत कवडे यांनी सादर केले. प्रारंभी साने गुरुजींच्या प्रतिमेस श्रीमती सुनिता चितळे वहिनी यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ही प्रार्थना सादर करण्यात आली. यावेळी दहा गरजू विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच वह्या देण्यात आल्या तसेच यावर्षीच्या वाचन स्पर्धेत यशस्वी झालेल्या पालवी शेटे सोहम शेटे समीक्षा पाटील प्रणव पाटील श्रीशा धनंजय पाटील शरद सुनील पाटील या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे आणि पुस्तके भेट देऊन गौरविण्यात आले. तसेच यावर्षीची साने गुरुजी शैक्षणिक शिष्यवृत्ती कुमारी राधिका राजेंद्र शिगवण कुमारी अनुराधा राजाराम गायकवाड आणि समीक्षा सतीश पाटील या विद्यार्थिनींना प्रदान करण्यात आली.
यावेळी बिडी पाटील डी आर कदम हरा जोशी महादेव जोशी यांच्यासह अन्य पालकांनी संस्कार केंद्राचा गौरव करणारी मनोगते व्यक्त केली प्रमुख पाहुणे म्हणून सांगलीच्या जिल्हा नगर वाचनालयाचे विद्यमान अध्यक्ष विकास जोशी उपस्थित होते त्यांनी भिलवडीचे संस्कार केंद्र काळाची गरज ओळखून समाजसेवेचे व समाज बांधणीचे कार्य करीत असल्याचे नमूद केले. अध्यक्ष श्रीमती सुनिता चितळे वहिनी यांनी याप्रसंगी संस्कार केंद्राला बहुमोल आर्थिक सहकार्य करून भविष्यकाळात संस्कार केंद्राचे कामकाज अतिशय चांगल्या पद्धतीने चालावे अशा अपेक्षा व्यक्त केल्या. श्री संजय गुरव सर यांनी आभार मानले सामुदायिक पसायदान यावेळी सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजन केंद्रप्रमुख सुभाष कवडे यांनी केले सौ मयुरी नलवडे सौ विद्या निकम यांनी कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले. गेली 25 वर्षे सातत्याने संस्कार केंद्राचे काम सुरू असल्याबद्दल अनेक ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करून हे काम कृष्णाकाठ्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचे भावना व्यक्त केल्या. यावेळी स्वीट बी डी पाटील सर यांनी सुभाष कवडे सर यांचा शाल श्रीफळ पुष्पहार देऊन विशेष सत्कार केला. यापुढेही संस्कार केंद्राचे कामकाज सातत्याने निष्ठापूर्वक करण्याची ग्वाही केंद्रप्रमुख सुभाष कवडे यांनी दिली. श्रीयुत हरा जोशी आणि सुभाष कवडे यांनी निवडक बालकवितांचे सादरीकरण याप्रसंगी केले.