

दर्पण न्यूज विटा प्रतिनिधी (शिराज शिकलगार); -सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहरातील विटा मायणी रोडवरील श्री राजलक्ष्मी अकाडमीमध्ये सतर्क नागरिक स्वयंसेवी सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य पोलीस विटा शहर अध्यक्ष दर्पण न्यूज विटा -खानापूर तालुका प्रतिनिधी शिराज शिकलगार यांनी विटा शहरातील राजलक्ष्मी अकडमी मध्ये विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना वाहतूक व मोबाईल या विषयावर अन मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस मित्र पत्रकार शिराज शिकलगार म्हणाले, समाजासाठी रस्त्यावर उतरून काम करणे फार अवघड असते अनेक संकटाला सामोरे जावे लागते, पोलीस मित्र म्हणून कर्तव्यदक्ष कामगिरी करत असताना, एक हात विटा पोलिसांना मदतीचा म्हणून मी स्वार्थपणे कोणतीही अपेक्षा न ठेवता सतर्क राहावे लागते, ते विटा पोलीस ठाणे व वाहतूक पोलिसांच्या मदतीसाठी , त्यामुळे वाहतुकीबाबत खबरदारी घेत अल्पवयीन मुला मुलींनी कोणतेही वाहन रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी चालवू नये, अठरा वर्षाच्या आतील कोणत्याही शालेय विद्यार्थ्यांना हा अधिकार नाही, वाहतुकीचे नियम समजून घेणे व त्याचे पालन करणे ही आत्ताच्या काळाची गरज आहे, दिवस रात्र वाहतूक पोलीस आपले काम करत असतात, कधी कधी वाहतूक पोलिसांच्या बरोबर पोलीसही रस्त्यावर आपली कर्तव्य दक्ष कामगिरी करताना दिसतात, पालकांनी सुद्धा आपल्या १८ मुलांना कमी वयात कोणत्याही प्रकारे चार चाकी व दुचाकी गाडी देऊ नये, असे म्हणत विद्यार्थ्यांनी फक्त शिक्षणाचे विचार डोक्यात घेणे आवश्यक आहे.तसेच वेळप्रसंगी संकटकाळी आपण ११२ ला फोन करा, पोलीस गाडी आपल्यापर्यंत १० मिनटात पोहचेल.
कारण आपणच आहे आपल्या जीवनाचे शिल्पकार म्हणून विद्यार्थ्यांनी चुकीच्या मार्गाने न जाता शिक्षणाचा मार्ग आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कमी वयामध्ये आपल्या हाताने कोणतीही चूक होणार नाही याची सुद्धा विद्यार्थ्यांनी दक्षता घेणे फार महत्त्वाचे आहे, आई-वडिलांच्या विचाराची धारा ही आत्ताच्या काळाची गरज आहे, आई वडील आणि आपले गुरुजन यांच्यासाठी वेळ द्या पण इतर चुकीच्या गोष्टीसाठी कोणालाही वेळ देऊ नका, असे अनेक विषयावर आपली विचारधारा व्यक्त केली, यावेळी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते,