


दर्पण न्यूज विटा -खानापूर तालुका प्रतिनिधी (शिराज शिकलगार)-: शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार भारतात 6 ते 14 वर्षे वयोगटातील प्रत्येक मुलाला मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण मिळण्याचा कायदेशीर हक्क आहे त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे प्रतिपादन *सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर विटा श्रीमती वैशाली शिरसे यांनी केले.
लोकनेते माननीय हणमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट विटा संचलित आदर्श माध्यमिक विद्यामंदिर विटा येथे तालुका विधि सेवा समिती खानापूर विटा आणि वकील संघटना विटा यांचे संयुक्त विद्यमाने कायदेविषयक जनजागृती शिबिर आयोजित केले होते यावेळी एडवोकेट विजय जाधव अध्यक्ष वकील संघटना, एडवोकेट सुखदेव कुंभार सेक्रेटरी, ॲड जयश्री शेलार,ऍड. ज्ञानदा ठाणेकर, एडवोकेट सुमित निकम, मुख्याध्यापक सुभाष धनवडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सुभाष धनवडे त्यांनी कायदेविषयक शिबिराचे महत्व सांगून केली प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. त्यानंतर एडवोकेट जयश्री शेलार यांनी एनडीपीएस ऍक्टNDPS ACT या विषयावर मनोगत व्यक्त करताना सध्याच्या काळातील तरुण मुला-मुली मधील व्यसनधीनता व त्याचे दुष्परिणाम त्यातून घडणारे गुन्हे, त्यानंतर होणारी शिक्षा त्याचबरोबर जबाबदार नागरिक म्हणून आपली वैचारिक व सामाजिक कर्तव्य या विषयी माहिती दिली. त्यानंतर ॲड.ज्ञानदा ठाणेकर यांनी POCSO ACT लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा यामध्ये अठरा वर्षाखालील सर्व मुला मुलींचे लैंगिक शोषण, अत्याचार आणि छळ या पासून संरक्षण करणे यामध्ये शिक्षेची तरतूद असून कोणत्याही मुलासोबत लैंगिक गुन्हा घडल्यास कठोर शिक्षेची तरतूद आहे अशी माहिती दिली. त्यानंतर अडवोकेट सुमित निकम यांनी कायद्या क्षेत्रातील नवीन करिअरच्या संधी याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. कार्यक्रमासाठी विद्यालयातील विद्यार्थी व सर्व शिक्षक उपस्थित होते
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस डी घाडगे सर यांनी केले.आभार श्री एम.आर. गायकवाड यांनी मानले.