दर्पण न्यूज विटा प्रतिनिधी ( शिराज शिकलगार):-सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहरातील सोनी हॉटेल चे संस्थापक मालक तसेच विटा नगरपालिकेचे माजी नगरसेवक, विटा व खानापूर आटपाडी आणि विसापूर सर्कलचे तरुण युवकांचे आशास्थान खानापूर आटपाडी आणि विसापूर सर्कल चे माजी आमदार ॲड सदाशिवराव (भाऊ) पाटील . माजी नगराध्यक्ष भाजपचे युवा नेते वैभव ( दादा) पाटील, युवा नेते माजी नगरसेवक विशाल (काका) पाटील पाटील कुटुंबातील सदस्य धडाकेबाज युवा नेतृत्व भाजपचे युवा नेते, पृथ्वीराज ( बाबा )पाटील यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करत असताना सर्वांना बरोबरीने घेऊन आपले कर्तव्य आपली जबाबदारी पार पाडणे गरजेचे असल्याचे सांगत, आज कोण मोठा आणि कोण लहान याचा कधीच विचार पृथ्वीराज बाबांनी केला नाही, प्रत्येकाच्या सुखा दुःखात सहभागी होऊन एक सामाजिक बांधिलकी जपताना दिसून येत आहेत, आज विटा शहरातील नामांकित हॉटेल सोनी या सोनी हॉटेलमध्ये काम करणारे कर्मचारी यांच्यावर विश्वास बाबांचा फार मोठा आहे, सोनी हॉटेलमध्ये स्वादिष्ट आणि रुचकर जेवणांने सर्वांचे मन जिंकणारे वस्ताद म्हणून दीपक या एका सामान्य कार्यकर्त्याच्या पाठिशी ठामपणे उभा रहात आपुलकीने विचारपूस करत आपलसं वाटणारे आपले आपल्या जिवाभावाचे हे कर्मचारी असे म्हणत पृथ्वीराज बाबा पाटील यांनी वस्ताद दीपक यांचा वाढदिवस सोनी हॉटेल येथे उपस्थित राहून साजरा केला, यावेळी पृथ्वीराज बाबा पाटील मित्र परिवार तसेच हॉटेलचे सर्व स्टॉप त्याचप्रमाणे त्यांचे मित्रपरिवार यांच्या उपस्थितीत वस्ताद दीपक याचा वाढदिवस साजरा करण्यात आला, यावेळी पोलीस मित्र पत्रकार शिराज शिकलगार हे उपस्थित होते .तर वस्ताद दीपक यांना उत्तम आरोग्य सुख समृद्धी लाभो उज्वल भविष्य लाभो असे म्हणाले पृथ्वीराज बाबा पाटील यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.