दर्पण न्यूज विटा प्रतिनिधी (शिराज शिकलगार) :-सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहरातील विटा उपविभागिय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विटा वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक उदय कुलकर्णी सह यांच्या वाहतूक पोलीसांच्या टीमने दमदार कामगिरी बजावली आहे, विटा शहरात अल्पवयीन दुचाकी चालकांना विटा वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक उदय कुलकर्णी यांनी चांगलेच धारेवर धरले आहे. अल्पवयीन दुचाकी चालकांना ताब्यात घेऊन त्यांच्या पालकांना विटा पोलीस ठाणे वाहतूक नियंत्रण शाखेत बोलावून चांगलीच समज दिली आहे. शिवाय काही अल्पवयीन चालक यांच्या पालकावर बेजबाबदारपणे आपल्या मुलांना गाडी देणे या अनुषंगाने पालकांच्यावर विटा न्यायालयात खटला दाखल केला आहे, तर काही ठिकाणी विटा शहराच्या सर्व भागांमध्ये सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर दारू पिऊन गाडी चालवणे अशा चारचाकी व दुचाकी वाहानधारकांवर सुद्धा कायद्याने बडगा उगारला आहे, त्यामुळे आता विटा वाहतूक नियंत्रण शाखेच्या वाहतूक पोलिसांच्या जाळ्यात रोज वाहतुकीचे नियम मोडणारे सापडतात, असे चित्र सध्या विटा शहरात दिसून येत आहे, शिवाय वाहतुकीचे नियम वाहनांखाली तुडवून बेधडकपणे वाहन चालवणाऱ्यांची संख्या प्रत्येक रस्त्यावर दिसते. वाहतूक पोलिसांनी कारवाई करून सुद्धा तरीही नियम भंग करणाऱ्यांची संख्या काही कमी होत नाही. सध्या विटा वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक उदय कुलकर्णी यांनी वाहतूक पोलिसांची टीम बरोबरीने घेऊन. विटा शहरात पांढऱ्या पट्ट्याच्या बाहेर असणाऱ्या वाहनधारकावर कारवाई बडगा उगारला आहे, अवैद्य प्रवासी, नशेत रस्त्यावर वाहन चालवणे, विनापरवाना वाहन चालवणे. ट्रिपल सीट. वाहतुकीचे नियम मोडणे. मोबाईलचा गाडीवर वापर करणे. नो पार्किंग ठिकाणी वाहन उभा करणे. मॉडीफाय सायलेन्सर. काळी काच. सिटबेल्ट न लावणे , फॅन्सी नंबर प्लेट विना हेल्मेट, व आणि इतर केसेस करून कारवाईचा धुमधडाका लावला आहे, त्यामुळे कुलकर्णी साहेब आले पळा पळा असे म्हणत तर अन्य वाहनधारक अधिनियम मोडायचे आणि मग मी नियम मोडलाच नाही असा कांगावा अनेक जण करतात. वाहनधारकांनो आपण वाहन चालवण्याचे लायसन्स काढता पण त्याचे नियम माहिती करून घेणे किंवा त्या नियमाचे पालन करणे हे वाहनधारकांचे कर्तव्य असल्याचे विटा वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक उदय कुलकर्णी यांनी दैनिक प्रीतीसंगमशी बोलताना सांगितले.