
दर्पण न्यूज विटा -खानापूर तालुका प्रतिनिधी (शिराज शिकलगार) :- भाळवणी येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलला ,विटा शहराचे माजी नगराध्यक्ष ( भाजपचे युवा नेते ॲड वैभव दादा पाटील यांनी भेट दिली.
यावेळी माजी नगराध्यक्ष ॲड वैभव पाटील यांचा रयत शिक्षण संस्था न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या उपस्थितीत शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला. या विद्यालयात माजी नगराध्यक्ष भाजपचे युवा नेते वैभव दादा पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्याशी गप्पा मारल्या. शिक्षण क्षेत्राबरोबर क्रीडा क्षेत्राची सुद्धा आपण आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. विद्यार्थ्यांनी मोबाईल पासून दूर राहिले पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास व आदर्श डोळ्यासमोर ठेवून मर्दानी खेळ, तसेच आपल्या आरोग्याची काळजी घ्या, क्रीडा क्षेत्रामध्ये मैदानावर बाजी मारा, असे म्हणत या विद्यालयाच्या टीमची सुद्धा चर्चा करून त्यांच्या समस्या अडचणी व सहकार्य जाणून घेतले. यावेळी वैभव दादा पाटील यांनी या विद्यालयास हॉलीबॉल चे खांब व इतर साहित्य,व खेळाडूसाठी ड्रेस किट देऊन आपले कर्तव्य पार पाडले. शिक्षण संस्था चालवत असताना फार काळजी घ्यावी लागते, असे म्हणत आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रयत शिक्षण संस्था याचे नाव रुपात असल्याचे सांगितले,तर या न्यू इंग्लिश स्कूल साठी रंगकाम करण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. या वेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.