


दर्पण न्यूज विटा -खानापूर तालुका प्रतिनिधी (शिराज शिकलगार) -: सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्या तील विटा शहर पोलीस ठाणे हद्दीतील विटा सांगली रोडवरील उद्योजक आनंदराव माळी यांच्या इमारतीत खानापूर तालुक्यातील वासुंबे येथील महादेव शेठ पवार यांचे नयनम ज्वेलर्स हे दुकान आहे. नेहमी सकाळी १० वाजता हे दुकान उघडले जाता तसेच रात्री ९/३० तर कधी उशीर हे नयनम ज्वेलर्स दुकान बंद करुन मालक व कर्मचारी जात असतात, शिवाय शनिवारी रात्री रविवार सुद्धा अपरात्री पावसाची रिपरिप सुरू होती. विटा शहरात विटा पोलीस पेट्रोलिंग सुद्धा काही भागात करत होते, मात्र रात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास काही अज्ञात ५ ते ६ चोरट्यांनी त्या ठिकाणी चोरीच्या उद्देशाने आले. त्यांनी पहिले संपूर्ण ज्वेलर्स आजूबाजूला फिरून पाहिली, काहीजण बाजूस उभा होते तर काही समोर उभा होते, अशी माहिती घटनास्थळी नागरिकांतून मिळाली, तसेच नयनम ज्वेलर्स हे आज सोन्या चांदीचे दुकान फोडून दरोडा टाकायचाच याच हेतूनं हे ५ ते ६ अज्ञात चोरट्यांनी पूर्ण तयारीनिशी आले असल्याचे दिसून येत आहे, तर चोरट्यांनी ओळख पटू नये यासाठी अक्षरशः पूर्ण काळे वस्त्र परिधान केले होते.तर तोंडावर मास्क वापरुन चोरी करण्याचा प्रयत्न केला होता, कारण हे अज्ञात चोरटे अट्टल चोरटे आहेत की दरोडेखोर आहेत असे अनेक प्रश्न या ठिकाणी या सीसीटीव्ही मध्ये कैद झालेल्या चोरट्यांच्या वर्णनावरून समजून येत आहे, शिवाय या चोरट्यांनी आजूबाजूचा अंदाज घेऊन नयनम ज्वेलर्स फोडण्याचा प्रयत्न केला आहे, आजूबाजूच्या नागरिकांना चोरटे कुलूप तोडण्याचा प्रयत्न असल्याचा संशय आल्याने नागरिकांनी आरडाओरड केला तर खाली चोरट्यानेही आरडाओरडा करून घटनास्थळावरून पसार झाले, विट्यात विटा सांगली रोडवर सतत रहदारीच्या मार्गावर मध्यरात्री ज्वेलर्स फोडण्याचा थरारक प्रयत्न रात्री दीड वाजण्याच्या सुमारास केल्याने नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे, सदर चोर त्यांनी नयनम ज्वेलर्सच्या मोठ्या शीटरचे कुलूप व पट्टी तोडण्याचा प्रयत्न केला आहे, शिवाय चोरटे हे पूर्ण तयारीने असल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे, अन्य घातक हत्यारे तसेच हातामध्ये चोरट्यांच्या पार व लोखंडी रॉड अन्य साहित्य ही दिसून आले. या धाडसी चोरी प्रकाराचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे चोरटे कैद झाले आहेत, काल दिवसभर पाऊस असल्याने त्या परिसरातील नागरिक झोपी गेले होते, सदर रात्रीच विटा पोलिसांना या संदर्भात माहिती देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली, पण चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत पोलीस व नागरिकांची चाहूल लागतात घटनास्थळावरून पसार झाले, संपूर्ण विटा शहरात रात्री उशिरा पोलीस या चोरट्यांचा शोध घेत होते, मेन रोड आणि गाव भागातच चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली आहे, सीसीटीव्ही फुटेज वरून विटा पोलीस या चोरट्याचा शोध पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे व गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार घेत आहेत.