
दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुणे) :-
दि ०४/०६/२०२६ रोजी धाराशिव जिल्हयातील मालमत्तेविषयक गुन्हयांवर प्रभावी कारवाई सुरू ठेवत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आणखी एक मोठे यश संपादन केले आहे. गोपनिय माहितीच्या आधारे टाकलेल्या | अचुक सापळयात पोस्टे नळदुर्ग गुरनं २७६ / २६ क ३३१ (४), ३०५ (अ) भान्यासं या घरफोडीच्या गुन्हयाचा उलगडा करण्यात आला.
स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि कासार व पथक यांनी केलेल्या कारवाई दरम्यान नरसिंग दत्तु माने वय ३५ वर्ष रा. तगरखेड ता. निलंगा जि.लातुर या सराईत गुन्हेगारास त्याचेवर पाळत ठेवून त्याला सिताफिने ताब्यात घेण्यात आले .चौकशीत आरोपीने गुन्हयाची कबुली दिली तसेच त्याच्या अन्य साथीदारांची नावे सांगितली . सदर गुन्हयातील सर्व | आरोपी लातुर जिल्हयातील असून पोलिसांनी जळकोट येथील भांडयाच्या दुकानातील चोरीस गेलेली पितळी व तांब्याची भांडी तसेच दोन एलईडी टीव्ही असा एकुण रु १,७०,०५५/- किंमतीचाभ मुददेमाल जप्त केला असून | आरोपीची वैदयकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाईस्तव पोस्टे नळदुर्ग यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा. श्रीमती रितू खोखर, पोलीस अधिक्षक धाराशिव व मा. श्री सचिन पांडकर, अपर | पोलीस अधिक्षक धाराशिव यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि श्री विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार, पोह शौकत पठाण, पोह प्रकाश औताडे, पोह जावेद काझी, पोह फरहान पठाण, पोका शुभम बिराजदार (टीएडब्ल्यु) चापोह नागनाथ गुरव यांचे पथकाने केली.