दर्पण न्यूज विटा -खानापूर तालुका प्रतिनिधी ( शिराज शिकलगार) -: सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा पोलीस ठाणे हद्दीत विटा लेंगरे रोड व साळशिंगे रोड लागत मध्यवर्ती चौंडेश्वरी चौकात रस्त्याच्या कडेला असणाऱ्या पान टपरीच्या आडोशाला एक अज्ञात इसम चोरी छुपे खुलेआम जागेत मटका घेत असल्याचे माहिती सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाल मिळाली या वेळी या पथकाने तिथे जाऊन त्या इसमास ताब्यात घेतले, व त्याचे नाव या पोलीस पथकाने पोलिसांनी विचारल्यानंतर त्याने विकी मदन देसाई, ( राहणार विटा,ता.खानापूर जिल्हा सांगली, यशवंतनगर विटा असे सांगितले). सदर विकी देसाई ( वय वर्षे ३३ ) या मटका एजंटास ताब्यात घेऊन विटा पोलीस ठाण्यात आणण्यात आले,सदर ही कारवाई सायंकाळच्या सुमारास करण्यात आली अशीही माहिती सांगली गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस पथकाने दिली, विकी देसाई याच्याकडून ११५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला .याबाबत पोलीस कर्मचारी सूर्यकांत साळुंखे यांनी विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली,विटा शहरात मटका एजंट सापडला असे समजल्यावर विटयातील बरेच मटका गाडे सायंकाळी बंद होते.