


दर्पण न्यूज कोल्हापूर:- कोल्हापूर येथे करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिराच्या जतन, संवर्धन आणि सर्वांगीण विकासाच्या नव्या पर्वाचा शुभारंभ व मंदिर विकास आराखड्याच्या शुभारंभ पार पडला. यानंतर (पोलीस परेड ग्राउंड) येथे भव्य कृतज्ञता सोहळा व जाहीर सभा पार पडली.याप्रसंगी भारताचे गृहमंत्री अमित शाह साहेब यांचा सत्कार आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी केला. यावेळी दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची मूर्ती व वारणा दूध संघाची उत्पादने दिली. या सत्काराप्रसंगी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम यांची उपस्थिती होती.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी वारणा दूध संघाची उत्पादने दिली.यावेळी हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.अशोकराव माने (बापू),जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम यांच्यासह मंत्रिमंडळातील मंत्री, खासदार, आमदार, विविध लोकप्रतिनिधी तसेच शासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.