दर्पण न्यूज विटा -खानापूर तालुका प्रतिनिधी (शिराज शिकलगार)-: लोकनेते मा. हणमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचालित आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर, विटा येथील कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग विभागाचा विद्यार्थी आदर्श रुपेश जाधव याची IBM कंपनी, हैदराबाद येथे असोसिएट सिस्टम इंजिनियर म्हणून यशस्वी निवड झाली आहे.
आजच्या स्पर्धात्मक युगात राष्ट्रीयस्तरावर नावाजलेल्या आय टी कंपनीत आदर्शमधील विद्यार्थ्यांची निवड होणे ही संपूर्ण संस्थेसाठी अभिमानास्पद बाब आहे. ही निवड आदर्श च्या उज्ज्वल करिअरसाठी एक भक्कम पायरी ठरणार आहे.
आज च्या स्पर्धेच्या युगात आदर्श इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांने नामांकित कंपनीत नोकरी मिळवल्या बद्दल संस्थेचे संस्थापक मा. सदाशिवराव भाऊ पाटील यांनी त्याचे विशेष कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. संस्थेचे अध्यक्ष अॅड. वैभव दादा पाटील यांनी देखील आदर्श चा गौरव करताना त्याच्या पालकांचे व शिक्षकांचे ही अभिनंदन केले. हे यश म्हणजे महाविद्यालयातील गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे फलित असल्याचे मत व्यक्त केले.
कार्यकारी संचालक श्री. पी. टी. पाटील, संचालिका कु. पूजा पाटील आणि आर्थिक संचालक श्री. रविराज सूर्यवंशी यांनी ही आदर्श च्या यशाबद्दल अभिनंदन करून, संपूर्ण संगणक विभागाचे विशेष कौतुक केले.
या यश प्राप्तीप्रसंगी प्राचार्य डॉ. पी. एस. पाटील, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागप्रमुख एस एस जाधव,कॉम्प्युटर सायन्स विभागप्रमुख प्रा. डॉ. व्ही.बी. इंगळे,डिपार्टमेंट टीपीओ कॉर्डिनेटर डि के जाधव व सर्व प्राध्यापक उपस्थित होते.
आदर्श इन्स्टिट्यूट विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत कार्यरत असून, अशी यशोगाथा म्हणजे संस्थेच्या दर्जात्मक शिक्षणाची ठळक पावती होय. त्याच्या यशाबद्दल त्याचे महाविद्यालयांच्या वतीने अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात यावेळी सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक उपस्थित होते