
दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुने) :-
आरोपी नामे-अनुराधा सतिश शिंदे, वय 36 वर्षे, रा. रामलिंगनगर येडशी ता. जि. धाराशिव या दि.18.06.2026 रोजी 18.30 वा. सु. आपल्या राहत्या घरासमोर अंदाजे 1,400 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 35 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. तर आरोपी नामे-शिवाजी शहाजी पवार, वय 27 वर्षे, रा. येडशी ता. जि. धाराशिव हे दि.18.06.2026 रोजी 20.45 वा. सु. आपल्या राहते घरासमोर अंदाजे 6,500 ₹ किंमतीची 65 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. तर आरोपी नामे-कृष्णा रामचंद्र शिंदे, रा.रामलिंगनगर येडशी ता. जि. धाराशिव हे दि.18.06.2026 रोजी 19.30 वा. सु. रामलिंगनगर येडशी येथे अंदाजे 19,850 ₹ किंमतीचे 397 लिटर गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम-65(ई) अन्वये धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे स्वतंत्र 3 गुन्हे नोंदविले आहेत.