
दर्पण न्यूज विटा प्रतिनिधी (शिराज शिकलगार)-:
सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या घटना व उघडकीस केलेल्या गुन्हा सविस्तर, हळदी कुंकू कार्यक्रमासाठी निघालेल्या महिलेच्या गळ्यातील सुमारे साडेतीन तोळ्याचे सोन्याचे गंठण काही अज्ञात इसमाने दुचाकीवरून येऊन हिसडा मारून पसार झाला होता. या प्रकरणातील विनोद गोविंद पिंगळे.( वय वर्षे ४२, राहणार श्रीरामपूर, ता, माळशिरस), या सराईत सोनसाखळी चोरट्यास विटा पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार यांनी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे अटक केली, यावेळी त्याच्यात ताब्यातील चार लाख दहा हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण व दुचाकी असा सुमारे चार लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल विटा पोलिसांनी जप्त केला आहे. या घटनेतील दुसरा साथीदार महादेव शंकर पवार ( राहणार श्रीपुर, तालुका माळशिरस हा फरार झाला आहे,). विटा येथील विवाहित चंदादेवी हजारे, या दिनांक १४ जानेवारी रोजी रात्री साडेसात वाजता शिवप्रताप मंगल कार्यालयाच्या पाठीमागील बाजू ने हळदीकुंकू कार्यक्रमासाठी जात होत्या तेव्हा संशयित विनोद पिंपळे व त्याचा साथीदार महादेव पवार हे दोघेजण दुचाकी मोटरसायकल क्रमांक ( एम.एच.४५_एवाय.३६३२) या मोटरसायकल वरून येत गळ्यातील चार लाख दहा हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण हिसडा मारून लंपास केले याप्रकरणी विटा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. त्यावेळी विटा पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे हवालदार महेश देशमुख ,अमोल पाटील ,अमोल कराळे, उत्तम माळी यांना सराईत चोरटा विनोद पिंपळे हा बार्शी येथे राहत असल्याची माहिती मिळाली. त्यावेळी पोलीस पथकाने बार्शी येथे सापळा लावून विनोद पिंपळे याच ताब्यात घेतले त्यावेळी त्याचा साथीदार महादेव पवार हा फरार झाला. चौकशी त्याने दोन गुन्हे केल्याचे उघडकीस आले, याप्रकरणी पिंपळे यास अटक करून त्याच्या ताब्यातील दुचाकी मोटरसायकल सह सुमारे चार लाख 80 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने विटा पोलिसांनी जप्त केले आहेत, या घटनेचा दुसरा साथीदार महादेव शंकर पवार याचा शोध विटा पोलीस घेत आहेत.