दर्पण न्यूज विटा प्रतिनिधी( शिराज शिकलगार) :- सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील ऐकावे ते नवलच सविस्तर मिळालेली माहिती अशी की सोनं नाणं महागडे मोबाईल किंवा गाड्यांची चोरी झाल्याचे ऐकिवात असतो, पण आटपाडी पोलीस ठाण्यात एका अनोखी चोरीची चर्चा रंगली आहे, आटपाडी पोलिसांनी ही आश्चर्यकीत केले आहे, करगणी येथील अहिल्यादेवी होळकर चौकातून सुलतान नावाचे गाढव लबाडीने चोरून नेल्याची धक्कादायक व मजेशीर घटना घडली आटपाडी पोलिसांनी नवीन कलमांनुसार मिथुन याच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला, फिर्यादी लखन बापू जाधव यांनी आटपाडी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार या सुलतान ची किंमत २५: हजार रुपये आहे त्याला ओळखण्यासाठी त्याच्यावर खास खुणा ही आहेत, सुलतान च्या नाकावर चंद्रकोर आहे, दोन्ही बाजूच्या ढोपरावर ( पायांवर) उभ्या रेषा आहेत, त्यामुळे राजेशाही थाटाचा सुलतान कुठेही दिसल्यास तो लगेच ओळखता येतो, लखन जाधव ( वय वर्षे ३७ यांचा गाढवांचा व्यवसाय आहे, त्याच्या संमतीशिवाय मिथुन लहू पवार ( सावळज तासगाव) याने पळवून नेल्याचा संशय आहे, आटपाडी पोलिसांनी याप्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे, तपास अधिकाऱ्यांनी संशयिताला वारंवार फोन केला मात्र समोरून फोन उचलला जात नसल्याचे डायरेक्ट नमूद आहे, आता पोलीस या सुलतान चा आणि त्या चोराचा शोध घेण्यासाठी तांत्रिक बाबींचा वापर करत आहेत, सध्या आटपाडी परिसरात या सुलतानच्या चोरीची आणि त्याच्या नाकावर असलेल्या चंद्रकोरी ची चर्चा जोरदार सुरू आहे ही चर्चा रंगली आहे, आटपाडी पोलीस सुलतान ला कधी शोधून मालकाच्या स्वाधीन करतात याकडे आटपाडीकरांचे व सर्वांचे लक्ष आहे.