दर्पण न्यूज विटा प्रतिनिधी (शिराज शिकलगार) :- सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा पोलीस ठाणे हद्दीतील विटा शहरातील एका रुग्णालयाच्या पार्किंग मधून लावलेली मोटर सायकल दुचाकी चोरट्याने लंपास केली आहे.
याप्रकरणी प्रथमेश लक्ष्मण भिसे राहणार मायणी तालुका खटाव जिल्हा सातारा यांनी विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे, ही घटना रविवार दिनांक 14 रोजी मध्ये रात्रीच्या सुमारास घडली. फिर्यादी प्रथमेश भिसे यांनी त्याची दुचाकी क्रमांक एम एच ११ सी एस १७७९ शिवशाही रुग्णालयाच्या आवारात लावली होती चोरट्यांनी दुचाकीचे कुलूप तोडून ती चोरून नेली विटा पोलिसांनी या चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास विटा पोलीस करीत आहेत.