
दर्पण न्यूज विटा -खानापूर तालुका प्रतिनिधी (शिराज शिकलगार) :- सांगली जिल्हा विटा शहरातील नामांकित हायस्कूल रयत शिक्षण संस्थेचे, विटा हायस्कूल व संजय भगवानराव पवार ज्युनिअर कॉलेज विटा या ठिकाणी दिनांक 15 जून रोजी वार सोमवार पासून शाळा सुरू झाली. शाळेच्या पहिल्या दिवशी नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे तसेच मागील शैक्षणिक वर्षात विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे ढोल ताशांच्या गजरात मोठ्या आनंदात स्वागत करण्यात आले.
या प्रवेशोत्सव कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून रयत शिक्षण संस्था दक्षिण विभाग सांगलीचे माजी चेअरमन माननीय श्री माधवराव मोहिते दादा तर प्रमुख पाहुणे म्हणून विटा नगर परिषदेच्या नगराध्यक्षा मा सौ. काजल ताई म्हेत्रे या होत्या. तसेच प्रमुख उपस्थितान मध्ये मा श्री सुभाषराव पाटील (बापू ),मा श्री उत्तमराव पवार, मा श्री सुमित भैय्या गायकवाड,मा श्री नंदकुमार पाटील,संजय म्हेत्रे इ मान्यवर उपस्थित होते.
नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे नवीन पाठ्यपुस्तक पेन आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले तसेच दहावी व बारावी बोर्ड परीक्षेत उत्तुंग यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा आणि एन एम एम एस परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे फेटा बांधून गुलाब पुष्प देऊन येथोचीत सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमाच्या वेळी प्रस्ताविकेमध्ये विद्यालयाचे प्राचार्य श्री जाधव सर यांनी विटा हायस्कूल दिवसेंदिवस कशी सर्वांगीण प्रगती करत आहे हे सांगितले तसेच शाळेच्या अमृत महोत्सवी वर्षात दहावी बोर्ड परीक्षेत विद्यालयातील संसिद्धी विठ्ठल जगताप या विद्यार्थिनीने 100% गुण मिळवून राज्यात सर्वप्रथम क्रमांक मिळवला तसेच त्यांनी विविध यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला.
तसेच प्रमुख पाहुणे नगराध्यक्षा सौ काजलताई म्हेत्रे यांनीही आपल्या मनोगता मध्ये विटा शहरातील विटा हायस्कूल हे एक नामांकित विद्यालय आहे आणि यातून गुणवत्ताधारक विद्यार्थी घडतात असे सांगितले त्यांच्या हस्ते विविध विद्यार्थ्यांचा गुणगौरव ही करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री अरुण काळे सर,पर्यवेक्षक श्री सतीश माने सर,सौ रास्कर मॅडम यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाच्या उपशिक्षिका सौ पाटील एम ए, सौ बाळीकाई ए एस मॅडम यांनी केले तर आभार विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री काळे यांनी मानले.