महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2026
दर्पण न्यूज मिरज/सांगली : महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2026 सांगली तथा सातारा स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणुकीसाठी दाखल नामनिर्देशनपत्रांच्या आज पार पडलेल्या छाननीत 7 उमेदवारांचे 11 नामनिर्देशनपत्र वैध ठरले तर एका उमेदवाराचे 2 नामनिर्देशनपत्र अवैध ठरले. जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक निरीक्षक डॉ. अमित सैनी यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मैनाक घोष, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे यांनी छाननी प्रक्रिया पार पाडली.
छाननीत नामनिर्देशनपत्र वैध ठरलेले उमेदवार खालीलप्रमाणे
1) धैर्यशील ज्ञानदेव कदम, मु. पो. गोरेगाव (वांगी), ता. खटाव, जि. सातारा — भारतीय जनता पक्ष
2) अभयसिंह खाशेराव जगताप, मु.पो. वरकुटे मलवडी, ता. माण, जि. सातारा — नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)
3) किशोर हनमंत धुमाळ, 123 बागडवाडा, शिवाजीनगर, गोडोली, सातारा — अपक्ष
4) तानाजी भगवान पाटील, क्रांतीसिंह नगर, पुजारवाडी, आटपाडी, ता. आटपाडी, जि. सांगली, अपक्ष
5) पाटील प्रताप धोंडीराम, मु.पो. उरण इस्लामपूर, पाटील भजनी मंडपाजवळ — अपक्ष
6) पाटील मयूर बाबासो, प्लॉट नं. 3, संजोग कॉलनी, पंचमुखी मारुती रोड, सांगली, ता. मिरज, जि. सांगली — अपक्ष
7) मेढे संजय नायकू, जुना हिराबाग रोड, वखार भाग, कोकणे गल्ली, नागोबा कट्टा जवळ, मिरज, ता. मिरज, जि. सांगली — अपक्ष
तर छाननीत श्रीमती सीमा सुनील पोतदार, मु. पो. मार्डी, ता. माण (दहिवडी), जि. सातारा (अपक्ष) यांचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरले.
या निवडणुकीसाठी अर्ज माघारीचा अंतिम दिनांक 04 जून 2026 (गुरुवार) असा आहे. या निवडणुकीसाठी एकूण 12 मतदान केंद्रे असून त्यापैकी 7 केंद्रे सातारा जिल्ह्यात आणि 5 केंद्रे सांगली जिल्ह्यात आहेत. एकूण मतदारसंख्या 895 असून त्यापैकी 472 मतदार सातारा जिल्ह्यातील आणि 423 मतदार सांगली जिल्ह्यातील आहेत. सातारा जिल्ह्यात एकूण 12 तालुके असून 1 जिल्हा परिषद, 9 नगरपरिषदा आणि 7 नगरपंचायती आहेत. सांगली जिल्ह्यात एकूण 10 तालुके असून 1 जिल्हा परिषद, 1 महानगरपालिका, 5 नगरपरिषदा आणि 6 नगरपंचायती आहेत.