



दर्पण न्यूज पुणे विटा प्रतिनिधी (शिराज शिकलगार) : -१ जून २०२६ एसटी महामंडळचा ७८ वा वर्धापन दिन संपूर्ण महाराष्ट्रात बसस्थानक,आगार , विभाग, प्रादेशिक विभाग, मुख्यालय इत्यादी ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . या निमित्ताने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ पुणे प्रादेशिक कार्यालयाकडून कर्तव्यावर असताना प्रामाणिकपणा, उत्पन्न वाढवणे, इंधन बचत, प्रवाशांशी सौजनपूर्ण वागणूक, सामाजिक बांधिलकी जपणे, जीव रक्षण, उत्कृष्ट प्रवासी सेवा, करणाऱ्या चालक,वाहक, यांत्रिक कर्मचारी,वाहतूक नियंत्रक, यांना लाल परी गौरव रत्न पुरस्कार २०२६ देऊन गौरवण्यात आले. तसेच हिंदू हृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक या स्पर्धेमध्ये विविध आगारांना पुरस्कार व रोख रक्कम बक्षीस देऊन गौरवण्यात आले. कोल्हापूर विभागातील छत्रपती संभाजी नगर येथे चालक पदावर काम करणारे श्री बाळासाहेब हिंदुराव कांबळे हे आपल्या बसमध्ये प्रवाशांसाठी पिण्याचे पाणी ,वर्तमानपत्रे ,मोबाईल चार्जर , प्रथमोपचार पेटी, कचरा पेटी, सुट्टे पैसे, फिरते वाचनालय इत्यादी सुविधा देत असतात तसेच त्यांनी २५ वर्ष विना अपघात सुरक्षित सेवा बजावली आहे, इंधन बचत करून व जास्तीत जास्त प्रवासी घेऊन आर्थिक दृष्ट्या महामंडळाचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न केला आहे . प्रामाणिकपणे सोन्याची अंगठी, रोख रक्कम, बस मध्ये सापडलेले मोबाईल, महत्वाची कागदपत्रे इत्यादी वस्तू त्या प्रवाशाचा शोध घेऊन त्यांना परत केले याची दखल घेत बाळासाहेब कांबळे यांना या कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती अमृता ताम्हणकर (प्रादेशिक व्यवस्थापक पुणे) यांच्या हस्ते लाल परी गौरव रत्न पुरस्कार २०२६ देऊन गौरवण्यात आले. प्रमुख पाहुणे श्री रमेश कांबळे (प्रादेशिक अभियंता पुणे ) हे होते सूत्रसंचालन श्री विठ्ठल शिंदे (लिपिक वाहतूक शाखा पुणे विभागीय कार्यालय )यांनी केले. आभार श्री गोविंद जाधव (डी पी एस पुणे) यांनी मानले.