दर्पण न्यूज पलूस( अभिजीत रांजणे) -: सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील बांबवडे येथील वेदांत सारिका विजयकुमार पवार यांनी आपल्या शैक्षणिक क्षेत्रात जे ई. ई. मेन्स परीक्षा मध्ये 98.30%, ऑल इंडिया रँक 3196, MHT- CET 1st रँक 98.96%, MHT- CET 2 nd रँक 98.54%असे यश संपादन केले . याबद्दल त्याचा सत्कार सांगली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण आणि आरोग्य सभापती मा. ऋषिकेश दादा लाड यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी उपस्थित बांबवडे गावचे जेष्ठ नेते हणमंतराव पाटील, पी. सी. पाटील (तात्या), विजयकुमार पवार दादा, ग्रामपंचायत सदस्या सौ. सारिका पवार , विजय पवार (दादा), गणेश पाटील, संजय पवार(बाबा), ग्रामपंचायत सदस्य प्रशांत पवार, सिद्धार्थ पवार, अजित पवार, महेश पाटील, दिग्विजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
