
दर्पण न्यूज पलूस भिलवडी बांबवडे प्रतिनिधी : जय हनुमान स्पोर्ट्स, बांबवडे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली “जय हनुमान चषक 2026” भव्य टेनिस बॉल फुल पीच क्रिकेट स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बक्षीस वितरण समारंभास स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीप (आप्पा) कदम व विवेक (दादा) भोसले, युवा उद्योजक बांबवडे, अमोल (पापा) भोरे, शशिकांत सुर्वे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विजेत्या संघांना चषक व पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
बांबवडे येथील जनता विद्यालयाच्या प्रांगणात गुरुवार दि. 28 मे ते 1 जून 2026 या कालावधीत ही स्पर्धा अत्यंत रोमहर्षकपणे झाली. स्पर्धेत परिसरातील नामांकित संघांनी सहभाग घेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. स्पर्धेच्या अंतिम फेरीत दमदार कामगिरी करत नागठाणे स्पोर्ट्स, नागठाणे संघाने प्रथम क्रमांक पटकावला. ईगल स्पोर्ट्स, रांजणी संघाने द्वितीय, श्रीवंत इलेव्हन, सातारा संघाने तृतीय तर जय हनुमान स्पोर्ट्स, बांबवडे संघाने चतुर्थ क्रमांक मिळविला.
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून संग्राम शिंदे (नागठाणे) यांना मॅन ऑफ द सिरीज पुरस्कार देण्यात आला. तर सुरेश भोसले (रांजणी) यांनी बेस्ट बॉलरचा मान पटकावला.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जय हनुमान स्पोर्ट्स, बांबवडेचे अमोल संकपाळ, संतोष पवार, अभिजीत गायकवाड, कुलदीप पवार, मनोज गुरव, अक्षय सोनावळे व अक्षय पोटे यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी संजय (दादा) शिंदे, तुषार सूर्यवंशी, सागर कदम, विकास कदम, तोफिक मुल्ला, राजेश पवार, भास्कर संकपाळ, राहुल पाटील, संतोष कदम व अभिजीत कदम यांची उपस्थिती होती.
स्पर्धेला क्रिकेटप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, अंतिम सामन्यास मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन दिले. त्यामुळे संपूर्ण परिसरात क्रिकेटचा उत्सवच अनुभवायला मिळाला.