

*स्वच्छ सर्वेक्षण च्या पार्श्वभूमी वरती नगराध्यक्षांचा शहरात धावता दौरा : भाजी मंडईतील व्यवसायिकांशी साधला सुसंवाद*
दर्पण न्यूज विटा प्रतिनिधी(शिराज शिकलगार) -: स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण या देशपातळीवरील स्पर्धेकरिता विटापालिकेने खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहासभैय्या बाबर, नगराध्यक्षा सौ. काजलताई म्हेत्रे, उपनगराध्यक्ष अमोलदादा बाबर, आरोग्य सभापती भालचंद्रभैय्या कांबळे व मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील, सर्व नगरसेवक यांच्या मार्गदर्शन खाली जय्यत तयारी करून शहर स्वच्छ व सुंदर बनवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेला आहे. शहरातील व्यवसायिक भाग व रहिवासी भाग या दोन्ही भागात रस्ते साफसफाई गटर साफसफाई वेस्ट टू बेस्ट चा वापर करत नाविन्यपूर्ण सार्वजनिक ठिकाणे सुशोभीत करण्यात येत आहेत
विटा नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ काजलताई म्हेत्रे यांनी विभाजीमंडळी येथे भेट देऊन सर्व व्यापारी व्यवसायिक व शेतकऱ्यांना भेटी देऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या भाजी मंडईमध्ये सुसज्ज बैठक व्यवस्था, लाईट,पाणी, शौचालय व्यवस्था, परिसर स्वच्छता, याबाबत आढावा घेतला. विटा शहरात 100% प्लास्टिक बंदी आहे. नवी भाजी मंडई प्लास्टिक मुक्त भाजी मंडई कारण्यासाठी ठोस पाऊले उचलली आहेत
भाजी मंडई मध्ये सुसज्ज पार्किंग व्यवस्था तसेच नागरिकांच्या व व्यावसायिकांच्या सुरक्षा साठी cctv ची व्यवस्था याबाबत माहिती घेतली आहे
यावेळी बोलताना नगराध्यक्षा सौ. काजलताई म्हेत्रे म्हणाल्या की भाजी मंडई येथील सर्व व्यावसायिकांनी स्वच्छतेबाबत वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे आपला परिसर स्वच्छ ठेवावा नगरपालिकेकडून आपणास ज्या सोयी सुविधा पुरवल्या जातात आहेत. आपण स्वच्छतेमध्ये आपले सक्रिय योगदान द्यावे आपल्या अडचणीसाठी नगरपालिका सदैव तत्पर आहे असे प्रभावी प्रतिपादन केले.
यावेळी उपस्थित नगराध्यक्षा सौ.काजलताई म्हेत्रे, नगरसेविका रुपाली धर्मेश पाटील, नगरसेविका वनिता अमर शितोळे, नगरसेविका रसिका प्रकाश सपकाळ, नगरसेविका उज्ज्वला राजकुमार पाटील, नगरसेविका लीला रामचंद्र भिंगारदेवे, नगरसेविका दिपा अविनाश चोथे, तसेच संजय भिंगारदेवे,शिवसेना मदत कक्षाचे गौरव गुळवणी, श्री शरद बोडरे,श्री नितीन चंदनशिवे, अर्जुन सूर्यवंशी, जयंत साबळे,श्री अभी गायगवळे,श्री महेश झाडे, श्री सुरज मंडले, श्री आकाश कदम, श्री. बुद्धिवान आंबवडे श्री. अभिजित ममदापुरे, शिराज शिकलगार तसेच नगरपरिषद चे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.