दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुने) :-
दि. 30/05/2026 रोजी पोलीस निरीक्षक श्री. विनोद ईज्जपवार यांना गोपनिय बातमी मिळाली की धाराशिव जिल्हयातील अटटल घरफोडया करणारा आरोपी नामे अजय श्रावन शिंदे हा सुंभा येथे आला आहे अशी माहिती मिळाली असता सदरची माहिती वरीष्ठांना कळवुन मा. पोलीस अधिक्षक श्रीमती रितु खोखर, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. सचिन पांडकर यांचे मार्गदर्शनाखाली स्वत पोनि श्री. विनोद इज्जपवार, स्थागुशा धाराशिव व स्थागुशाचे सर्व पथके रवाना होवुन माहिती मिळालेले ठिकाणी जावुन नमुद आरोपी याचा शोध घेत असताना नमुद आरोपी यांने पोलीसांना पाहुन पळुन जात असताना पोलीसांनी त्यास अतिशय शिताफीने पकडुन त्यास व श्रावन जमनाशा शिंदे या दोघांना ताब्यात घेवुन अधिक विश्वासात घेवुन जिल्हयातील घरफोडी चे गुन्हयाबदल विचारले असता त्यांनी सुरवातीस उडवाउडवीचे उत्तरे दिली त्यापैकी अजय श्रावन शिंदे यास अधिक विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याने धाराशिव जिल्हयातील पोस्टे बेंबळी, ढोकी, धाराशिव ग्रामीण, शिराढोण, मुरुम, लोहारा, वाशी, परंडा, येरमाळा, आनंदनगर हददीतील घरफोडीचे एकुण 32 गुन्हे त्याचे इतर साथीदारासह केले असल्याचे सांगीतले. नमुद आरोपीचे ताब्यातुन त्याचे हिशाला आलेले घरफोडीचे गुन्हयातील चोरीचे एकुण 18 तोळे सोने मिळुन आले, तसेच काही सोने विकुन आलेल्या पैशातुन आरोपीने एक ब्रेझा चारचाकी व एक नवीन बुलेट टु व्हिलर गाडी विकत घेतली असल्याचे सांगीतले. असा एकुण 45,35,000/लाख रु. चा मुददेमाल जप्त केला आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्रीमती. रितु खोखर, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. सचिन पांडकर,यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार, सपोनि श्री. सचिन खटके, श्री. अमोल मोरे, पोह/ विनोद जानराव, शौकत पठाण, दयानंद गादेकर, नितीन जाधवर, बळीराम शिंदे, जावेद काझी, प्रकाश औताडे, समधान वाघमारे, बबन जाधवर, अमोल चव्हाण, अशोक ढगारे, राहुल नाईकवाडी, अमोल निंबाळकर, राठोड, प्रदीप वाघमारे, पुष्कर मुंगळे, मपोह / शोभा बांगर, चापोह / सुभाष चौरे, महेबुब अरब, विनायक दहिहंडे, प्रकाश बोईनवाड, दिपक डोंगरे, बाबा गुरव, रोहीत दंडनाईक, यांचे पथकाने केली आहे.