
दर्पण न्यूज पलूस- भिलवडी प्रतिनिधी : सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी प्रचंड प्रमाणात कल्याणकारी योजना राबविणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या सर्वश्रेष्ठ प्रशासक होत्या. त्यांच्या विचारवाटेवरून जाण्याची समाजाला गरज आहे, असे प्रतिपादन वाणी भूषण प्रा. एन डी बिरनाळे यांनी केले. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीप आप्पा कदम यांच्या संकल्पनेतून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त यशस्वी विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्यात कर्तुत्ववान व्यक्तींचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न झाला. शिवशंभो मल्टीपर्पज हॉल पलूस तासगाव रोड येथे हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. बिरनाळे बोलत होते.
प्रा. बिरनाळे म्हणाले, तीनशे वर्षांपूर्वी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी इंदूरमध्ये सर्वसामान्यांच्या हिताचं राज्य जपलं संघर्षामध्ये टिकवलं संस्कृती टिकली तरच आपला समाज टिकू शकतो म्हणून त्यांनी संस्कृती रक्षणाचे काम केलं. शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतकऱ्यांना शेतसारा माप तसेच सामाजिक कामासाठी योग्य व्यक्तींना जमिनी करारपट्ट्याने देणे. अशा प्रकारचे उपक्रम त्यांनी त्या काळात राबविले होते. अनेक किल्ले बांधले, नदी वरती घाट बांधले, हम रस्ते बांधले वृक्षारोपणाचे प्रचंड काम त्यांनी केले. असं विधायक काम करणाऱ्या अहिल्यादेवींनी वस्त्रे आणि दागिने याच सौंदर्य नसून समाजाच्या सेवाभावी वृत्तीने सेवा करणे आणि लोकांसाठी कार्यरत राहणे म्हणजे खरं सौंदर्य असतं हे दाखवून दिले. आजच्या काळात स्त्रियांनी अहिल्यादेवींचा हा आदर्श घेणे गरजेचे आहे.
प्रदीपआप्पा कदम यांनी स्वागत व प्रस्तावित केले. प्रदीप अप्पा कदम म्हणाले, अहिल्यादेवींचा आदर्श घेत आज समाजात स्त्रियांनी सर्व क्षेत्रात आघाडी घेतली आहे. पलूस तालुक्यातील मुलींना प्रोत्साहन मिळावे ह्या हेतूने आम्ही हा सत्कार सोहळा आयोजित केला आहे. अत्यंत हिम्मतीने त्यांनी राज्य सांभाळले होते . इंग्रजांच्या काळात मराठा साम्राज्याचा अस्तित्व टिकवून ठेवण्याचे कार्य अहिल्यादेवींनी केलं. स्त्री-पुरुषांचा असा कोणताही भेदभाव न करता त्यांनी राज्य चालवलं खऱ्या अर्थाने त्यांचा आदर्श घेऊन आपण सर्वांनी पुढे जाण्याची आवश्यकता आहे. विशेषतः मुलींनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालल पाहिजे.
प्रतिष्ठा फाउंडेशनचे अध्यक्ष तानाजीराजे जाधव व विद्यार्थिनी साक्षी संतोष वायदंडे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
यावेळी जनता विद्यालय बांबवडे, पंडित विष्णू दिगंबर पुरस्कार, विद्यालय पलूस, हिंदकेसरी गणपतराव आंधळकर हायस्कूल आंधळी, सौ. विजयमाला कदम माध्यमिक आश्रम शाळा सांडगेवाडी, लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर व ज्युनिअर कॉलेज पलूस, श्री सिद्धेश्वर हायस्कूल तुरची, स्वामी रामानंदनगर महाविद्यालय रामानंदनगर या विद्यालयांसह विविध महाविद्यालयांतील यशस्वी विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रतिष्ठा फाउंडेशनचे अध्यक्ष तानाजीराजे जाधव, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष प्रा बाळासाहेब कटारे, पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव धोंडीराम शिंदे, विकास अआरबुने, पैलवान संभाजी जाधव, आदर्श मुख्याध्यापक ए टी पाटील, अमीर पठाण, दौलतराव पाटील, राहुल पाटील, हिम्मत सिसाळ, सागर सुतार, तौफिक मुल्ला, तुषार सूर्यवंशी, अभिजीत कौलगे, अभिजीत सावंत, विशेष कार्यकारी अधिकारी शामराव सूर्यवंशी, सागर कदम, सागर मासाळ सुमेध परीट ओमकार परबत, आशिष सूर्यवंशी, संतोष कदम, अभिजीत कदम, अनिल पाटील, उल्हास पाटील, भास्कर संकपाळ, सचिन कुऱ्हाडे यांच्यासह विद्यार्थी व पालक उपस्थित होते. विखे पाटील कृषी परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय कुमार शिंदे यांनी आभार मानले. अभिजीत सावंत यांनी सूत्रसंचालन केले.