
दर्पण न्यूज पलूस भिलवडी( अभिजीत रांजणे):- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी – माळवाडी येथील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाची सांगता होणार तोपर्यंत युवा नेते ऋषी भैय्या टकले यांना एका सत्कार मूर्ती विद्यार्थिनीची गरिबी परिस्थितीची माहिती मिळताच त्यांनी क्षणाचाही विचार न करता तिला मोठी मदत केली आणि पूर्ण शिक्षणासाठी दत्तक ही घेतलं. दिलदार मनाचे युवा नेते ऋषी भैय्या टकले यांच्या आशीर्वादाने आपलं शिक्षण पूर्ण होणार म्हणून ती विद्यार्थिनी धसाधसा रडू लागली. एखाद्याच्या आयुष्यात पडत्या काळात खंबीरपणे कसे उभे राहिचे, याचा आदर्श आज ऋषी भैय्या टकले यांनी अनेकांना दिला.
माळवाडी येथे आज 31 मे रोजी सकाळी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभात वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालय खंडोबाचीवाडी येथे शिक्षण घेणारी माळवाडी येथे राहणारी विद्यार्थिनी तनिष्का प्रमोद गंगधर हिचे 10 परीक्षा सुरू असताना वडील वारले होते. मात्र, वडील वारले यांचे दुःख बाजूला ठेवून आपल्या जिद्दीच्या जोरावरच तिने यश संपादन केले. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची वडीलानंतर आता आई ,एक भाऊ, एक बहीण राहत आहेत. आज तिच्या सत्कारानंतर तिच्या गरिबीची संपूर्ण माहिती युवा नेते ऋषी भैय्या टकले यांना मिळाली. ऋषी भैय्या टकले यांनी क्षणांचा ही विचार न करता तनिष्का प्रमोद गंगधर हिला मोठी मदत केली. पुढील शिक्षणासाठी दत्तक घेऊन सर्व मदत करण्याचे सांगितले. दिलदारपणा जपणारे युवा नेते ऋषी भैय्या टकले यांच्या आशीर्वादाने आपलं शिक्षण पूर्ण होणार म्हणून ती विद्यार्थिनी धसाधसा रडू लागली. तु माझी लहान बहीण आहेस , शिक्षणासाठी तुला सर्व मदत मी करणार तु जोमाने आणि चांगले शिक्षण घे, असेही ऋषी भैय्या टकले यांनी तिला सांगितले. एखाद्याच्या आयुष्यात पडत्या काळात खंबीरपणे कसे उभे राहिचे, याचा आदर्श आज युवा नेते ऋषी भैय्या टकले यांनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिनी अनेकांना दिला. या दिलदारपणाचे कौतुक सर्वत्र केले जात आहे.
(युवा नेते ऋषी भैय्या टकले हे आमदार गोपीचंद पडळकर यांचे अत्यंत विश्वासू सहकारी असून भिलवडी माळवाडी येथील आहेत.)