

दर्पण न्यूज विटा प्रतिनिधी (शिराज शिकलगार)- : स्वच्छ सर्वेक्षण मूल्यांकनाच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष सौ काजल म्हेत्रे यांनी शहरातील विविध ठिकाणी पाहणी करत कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर यांनी विटा शहर कायमस्वरूपी स्वच्छतेमध्ये अग्रेसर राहण्यासाठी नगराध्यक्षा सौ काजल म्हेत्रे, उपनगराध्यक्ष अमोल बाबर, आरोग्य सभापती भालचंद्र कांबळे, मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील व सर्व नगरसेवक पदाधिकारी यांनी नाविण्यापुर्णतेसह शहर स्वच्छतेचा निर्धार करून केंद्र सरकार तर्फे होणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षणच्या अनुषंगाने विटा नगरपरिषदेकडून शहर स्वच्छ, सुंदर व निरोगी ठेवण्यासाठी विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. विटा शहर हे स्वच्छतेत अव्वलस्थानी आहे यामध्ये सातत्य ठेवत 100% कचरा मुक्त शहर तसेच शहरातून कचरा विलगीकरण करून दररोज संकलन करणे, रस्ते स्वच्छता, गटार साफसफाई आणि नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती पालिकेच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
आज नगराध्यक्ष काजल म्हेत्रे यांनी विवेकानंद नगर तलाव परिसर, कदमवाडा परिसर, चिरवळ ओढा परिसर, घुमट माळ परिसरात पाहणी करत घेतला कामाचा आढावा घेतला आहे.
यावेळी संजय भिंगारदेवे यांच्यासह आरोग्य अधिकारी,कर्मचारी,नागरिक उपस्थित होते.