दर्पण न्यूज भिलवडी /पलूस प्रतिनिधी : जय हनुमान स्पोर्ट्स, बांबवडे आयोजित “जय हनुमान चषक 2026” या भव्य टेनिस बॉल फुल पिच क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीप (आप्पा) कदम यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले.
बांबवडे येथील जनता विद्यालयाच्या क्रीडांगणावर या स्पर्धांना प्रारंभ झाला असून या स्पर्धा १ मे पर्यंत रंगणार आहेत.
उद्घाटन प्रसंगी विवेक (दादा) भोसले, शशिकांत सुर्वे, नवनाथ पवार, भूषण पाटील , अमोल (पापा) भोरे, पांडुरंग संकपाळ, संजय शिंदे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
जय हनुमान स्पोर्ट्सचे अमोल संकपाळ, उदय सुर्यवंशी, कुलदीप पवार, अभिजीत गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी या स्पर्धेचे आयोजन केले आहे.
विशेष उपस्थिती म्हणून विकास कदम, सागर कदम, भास्कर संकपाळ, तौफिक मुल्ला, राजेश पवार, तुषार सुर्यवंशी, स्वप्नील कदम, अभिजीत कदम, उमर मुल्ला आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रदीप आप्पा कदम म्हणाले, “क्रिकेट हा सर्वात लोकप्रिय खेळ असून हा खेळ खेळल्याने शरीर निरोगी आणि सुदृढ राहते. मोबाईलवर गेम खेळण्यापेक्षा मैदानावर उतरून क्रिकेट खेळणे अधिक चांगले आहे. ग्रामीण भागात अशा प्रकारच्या स्पर्धा सातत्याने झाल्या पाहिजेत. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व संघांचे आणि खेळाडूंचे अभिनंदन करतो. खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही नेहमीच पुढे असतो. ग्रामीण भागातील खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.”
या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकासाठी ६१ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ४१ हजार रुपये, तृतीय क्रमांकासाठी २० हजार रुपये आणि चतुर्थ क्रमांकासाठी १५ हजार रुपयांची आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तसेच प्रत्येक सामन्यासाठी आणि संपूर्ण स्पर्धेदरम्यान विविध वैयक्तिक बक्षिसेही देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.