दर्पण न्यूज मिरज /सांगली प्रतिनिधी :-
सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय,भारत सरकार आणि खासदार रामदासजी आठवले युथ फाऊंडेशन संचलित सांगली येथील हौसाई वृद्धाश्रमाच्या वतीने आरक्षणाचे जनक सामाजिक न्याय, समता, शिक्षणाचे महान पुरस्कर्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या 152 व्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराचे आयोजन केले असूनराजकीय सामाजिक, शिक्षण,आरोग्य,कला, सांस्कृतिक ,क्रिडा, शेती, व साहित्य क्षेत्रातील नामवंत समाजसेवकांना पुरस्काराने सन्मानित करणार असून इच्छुकांनी लवकरात लवकर प्रस्ताव सादर करावेत असे आवाहन संस्थापक अध्यक्ष संदेशभाऊ भंडारे यांनी केले. राज्यातील विविध क्षेत्रामध्ये भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तीस रोख रक्कम 11,000 रुपये, सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ स्वरुपाचा राज्यस्तरीय समाजभुषण पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे. सदर समाजभूषण पुरस्काराचे वितरण येत्या 26 जून रोजी म्हणजे सामाजिक न्याय दिवस रोजी देशाची सुवर्णकन्या ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्ष राज्यसभा खासदार पी.टी.उषा, राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमारजी शिंदे, माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड, खासदार ज्योती वाघमारे आणि सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार समारंभ आयोजित करण्यात आला असून रयतेचे न्यायप्रिय राजर्षी छ.शाहू महाराज यांच्या आरक्षण,शैक्षणिक सामाजिक कार्याचा आदर्श तळागाळात रुजवण्यासाठी हा सामाजिक उपक्रम हौसाई वृद्धाश्रम सांगलीच्या वतीने पुरस्कार वितरण समारंभ आयोजित केला आहे, निवड समितीकडे पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करावेत असे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदेशभाऊ भंडारे यांनी केले. यावेळी तथास्तु कल्चरल अकॅडमीच्या रश्मीताई भंडारे, रेखाताई शेंडे, हौसाई वृद्धाश्रमाचे उपाध्यक्ष जयवंत माळी, संचालक रतन तोडकर, प्रविण उपाध्ये, प्रशांत सावंत, हरिराम खबाले, विकास भंडारे, शाहीर चंद्रकांत गायकवाड, सांस्कृतिक विभाग प्रमुख चैताली तातुगडे, संदिप कोरे, सोनिका कांबळे, भारती लोंढे, हौसाई वृद्धाश्रमाच्या अधीक्षक रेखा माळी यांच्यासह पुरस्कार निवड समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.