दर्पण न्यूज विटा खानापूर तालुका प्रतिनिधी ( शिराज शिकलगार):- विटा पोलिस ठाण्याची दमदार कामगिरी केली.
देशी बवावटीचे अवैध्य-पिस्टल बाळगणाऱ्या इसमास अटक करण्यात आले आहे.
विटा पोलीस ठाणे, ता. खानापुर, जि. सांगली
अपराध क्र.आणि कलम गु.र.नं. २१०/२०२६ भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३,२५ प्रमाणे
फिर्यादी नाव महेश अरुण संकपाळ, पो.कॉ./११७८, नेम. विटा पोलीस ठाणे, जि. सांगली, दि. २०.०५.२०२६ रोजी १७.४० वा. चे सुमारास मौजे बलवडी गावचे हद्दीत गु.दा.ता.वेळ दि. २०.०५.२०२६ रोजी २०.३६ वा. महेश अरुण संकपाळ यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली.
मा.पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी साो, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती कल्पना बारवकर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी विटा श्री. विपुल पाटील, पोलीस निरीक्षक श्री. धनंजय फडतरे, विटा पोलीस ठाणे, पोलीस उपनिरीक्षक अभिजित कणसे, विटा पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली
(१) अमोल पाटील, पो.हवा.
(४) महेश संकपाळ, पो.कॉ.
(७) किरण खाडे, पो.हवा.
(१०) गोरक्ष धुमाळ, पो.कॉ
(२) उत्तम माळी, पो.हवा.
(५) अक्षय जगदाळे, पो.कॉ
(८) विलास मोहिते, पो.हवा.
सर्व नेमणुक विटा पोलीस ठाणे
(३) महेश देशमुख, पो.कॉ
(६) सोमनाथ पाटील पो.हवा.
(९) वैभव कोळी, पो.कॉ.
(११) करण परदेशी, पो.हवा.
(१४) अजय पाटील, पो.कॉ.
(१२) विजय पाटणकर, पो.कॉ.
(१३) इम्राण महालकरी, पो.कॉ.
(१५) अभिजित पाटील, पो.कॉ.
सर्व नेम. सायबर पोलीस ठाणे, सांगली
आरोपींचे नाव : १) ओंकार ऊर्फ ओ.के. राजाराम काकडे, वय २३ वर्षे, रा. शिरटे, ता. वाळवा, जि. सांगली.
अटक तारीख व वेळ : यातील आरोपीस दि. २०.०५.२०२६ रोजी अटक केली आहे.
जप्त मुद्देमाल
१) ५०,०००/- रु. एक गावठी बनावटीचे पिस्टल असुन त्याची बॉडी स्टीलची असुन, सदर पिस्टलला ट्रिगर, ट्रिगर गार्ड बॅरल, मॅगझीन, सेप्टी कॅच असुन सदर पिस्टलच्या दोन्ही बाजुस प्लॅस्टीकची काळ्या रंगाची ग्रीप असलेली पिस्टल जु.वा.कि.अं.
२) ७०,०००/- रु. एक गावठी बनावटीचे अॅटोमेटीक पिस्टल असुन त्याची बॉडी स्टीलची असुन, सदर पिस्टलला ट्रिगर, ट्रिगर गार्ड बॅरल, मॅगझीन, सेप्टी कैंच सदर पिस्टलच्या दोन्ही बाजुस प्लॅस्टीकची काळ्या रंगाची ग्रीप असलेली पिस्टल जु.वा.किं.अं.
३) १००/- रु. किंमतीची एक पिस्टलची जिवंत काडतुस त्याचे समोरील बुलेटचा भाग काळा पडलेला दिसत आहे. जु.वा.किं.अं.
४) १००/- रु. किंमतीची एक पिस्टलची जिवंत काडतुस जु. वा. किं. अं.
५) १०/- रु. किंमतीची एक जुनी बंद असलेली हिरव्या रंगाची ठिपक्याची डिझाईन असणारी पिशवी जु.वा.किं.अं.
१,२०,२१०/- रुपये एकूण
थोडक्यात हकीकत : वरील विवरण प्रमाणे मा. पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी सोो. व मा. अप्पर पोलीस
अधिक्षक श्रीमती कल्पना बारवकर मॅडम यांनी आप-आपले पोलीस ठाणे हद्दीत अवैद्य धंद्यांवर व बेकायदा-बिगर परवाना शस्त्र बाळगणारे इसमांवर कारवाई करणेबाबतचे आदेशीत केले होते. त्याअनुशंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विपुल पाटील यांचे मार्गदर्शनाखाली विटा पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री. धनंजय फडतरे यांनी पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकास पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग करुन कारवाई करणेबाबत सुचना दिल्या होत्या.
सदर सुचनांचे अनुशंगाने पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथक विटा पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना महेश अरुण संकपाळ यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, इसम नामे ओंकार ऊर्फ ओ.के. राजाराम काकडे, वय २३ वर्षे, रा. शिरटे, ता. वाळवा, जि. सांगली हा अवैध्यरित्या स्वतःचे ताब्यात अग्निशस्त्र बाळगुन बलवडी (भा.) गावात फिरत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने लागलीच गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार हे हॉटेल देवा जवळ कडेपुरकडे जाणारे रोडवर जावुन थोडे अलीकडे थांबुन पायी चालत जावुन पाहिले असता एक इसम थांबलेला दिसला. पोलीस पथक हे सदर इसमास पकडनेकरीता जात असताना सदर इसम हा पोलीस पथकास पाहून पळून जात असताना गुन्हे प्रकटीकरण पथकाने सदर इसमाचा पाठलाग करुन त्यास शिताफीने ताब्यात घेवुन त्याची दोन पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता सदर इसमाचे हातात एक हिरव्या रंगाची पिशवी दिसली सदर पिशवीमध्ये दोन देशी बनावटीचे अग्निशस्त्र (पिस्टल) मिळून आले. तसेच त्याच्या अंगझडतीत दोन जिवंत जिवंत काडतुस मिळुन आल्या. त्यानंतर सदरच्या देशी बनावटीचे पिस्टल बाळगणेबाबत त्याचेकडे परवाना आहे का? याबाबत विचारणा केली असता त्याबाबत त्याचेकडे कोणताही परवाना नसल्याचे त्याने सांगीतले. त्यावेळी सदरच्या पिस्टल या कोठुन व कोणाकडुन आणल्या याबाबत विचारना केली असता तो काही एक समाधानकारक माहिती न सांगता उडवा उडवीची उत्तरे देवू लागला. त्यानंतर सदर इसमासह त्याच्या कब्जात मिळून आले देशी बनावटीच्या दोन पिस्टल व दोन जिवंत जिवंत काडतुस हे पुढील तपासकामी पोलीस उपनिरीक्षक अभिजित कणसे यांनी पंचासमक्ष जप्त करुन सदर इसमाविरुध्द विटा पोलीस ठाणे येथे आर्म अॅक्ट ३, २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अभिजित कणसे हे करीत आहेत.