दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुने) :-
मराठी ग्रामीण साहित्यात ऐतिहासिक योगदान देणारे, शेती आणि मातीशी अखेरच्या श्वासापर्यंत इमान राखणारे ज्येष्ठ साहित्यिक कै. प्रा. भास्कर चंदनशिव यांना अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने यंदाचा मरणोत्तर ‘साहित्य जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. ₹५१,००० रोख, मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
कळंब-धाराशिवचे आमदार कैलास दादा पाटील यांच्या पुढाकाराने आणि अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे. धाराशिव येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात उभारण्यात आलेल्या ‘लोकनेते अजितदादा पवार साहित्यनगरीत’ दि. २९ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता ३२ व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. या सोहळ्याचे उद्घाटक व महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री मा. ना. श्रीमती सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार कै. प्रा. चंदनशिव यांच्या पत्नी श्रीमती कमलताई चंदनशिव यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येईल.
कृषक समाजाला साहित्याच्या केंद्रस्थानी आणणारे ‘भास्कर’प्रा.भास्कर चंदनशिव यांनी आपल्या सशक्त लेखणीच्या माध्यमातून ग्रामीण लोकजीवन आणि कृषक समाजाच्या व्यथा जिवंतपणे साहित्याच्या केंद्रस्थानी आणल्या. एखाद्या झुंजार सेनानीप्रमाणे शेतकऱ्यांचा आक्रोश जगासमोर मांडण्यासाठी त्यांची लेखणी समशेरीसारखी तळपली. गर्द अंधकारात चाचपडणाऱ्या शेतकरी वर्गासाठी त्यांचे साहित्य आशेचा ‘भास्कर’ (सूर्य) ठरले. त्यांच्या या अतुलनीय आणि प्रेरणादायी साहित्य प्रवासाची कृतज्ञतापूर्वक दखल घेऊन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेने त्यांना या सर्वोच्च पुरस्काराचे पत्र आज श्रीमती कमलताई चंदनशिव यांना देण्यात आले,
५१ हजार रुपये रोख स्मृतिचिन्ह,शाल,मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे, आज कळंब (धाराशिव) येथे श्रीमती कमलताई चंदनशिव यांना पुरस्काराचे पत्र देण्यात आले,
या वेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार कैलास दादा पाटील ,साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.शरद गोरे,राष्ट्रीय विश्वस्त ज्ञानेश्वर पतंगे,मराठवाडा अध्यक्ष परमेश्वर पालकर,प्रा.नंदकुमार बालुरे,प्रा.उन्मेष शेकडे, आदीजण उपस्थित होते.