
दर्पण न्यूज मिरज सांगली :- मिरज येथे जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत दादा कदम यांच्याकडून रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल पदी फेर निवड झाल्याने मानसिंग बँकेचे संस्थापक जे के बापू जाधव यांचा सत्कार करण्यात आला.
मानसिंग बँकेचे संस्थापक जे के बापू जाधव यांची रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल पदी फेर निवड झाल्याने जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत दादा कदम यांनी बापू चे कौतुक केले. कामाच्या जोरावरच जे के बापू जाधव यांची फेर निवड झाली आहे, असे मत समित कदम यांनी व्यक्त केले.
या सत्कार बद्दल जे के बापू जाधव यांनी समित कदम यांचे आभार मानले.
या सत्कार समारंभ प्रसंगी जनसुराज्य पक्षाचे सांगली महानगर पालिकेचे नगरसेवक डॉ पंकज म्हेत्रे, सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, जनसुराज्य पक्षाचे पदाधिकारी प्रवीण धेंडे, पत्रकार अभिजीत रांजणे, नानासाहेब घोरपडे, नारायण दिवटे, आप्पा पवार आदी मान्यवर उपस्थित होते.