
दर्पण न्यूज विटा प्रतिनिधी ( शिराज शिकलगार) :- सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहरातील विटा नगरपरिषद हद्दीमध्ये विटा मायणी रोडवरील भाजी मंडई मध्ये वीज पुरवठा करणारी मेन डीपी या डीपी मधून सकाळी अचानक धुराचे लोटे होऊ लागले काही क्षणात डीपी पेटणार अशी परिस्थिती त्या ठिकाणी निदर्शनास आली. कोणत्याही डीपी पेट घेणार असे चित्र निर्माण झाले. यावेळी काही नागरिकांच्या निदर्शनास आले, यावेळी सदर त्या ठिकाणी सामाजिक कार्य करणारे पोलीस मित्र पत्रकार शिराज शिकलगार यांना माहिती दिली त्यांनी तातडीने विटा महावितरण विभागाला संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला ताबडतोब मेन लाईन वीज पुरवठा बंद करा. अन्यथा मेन लाईट सप्लाय करणारी डीपी पेठ घेईल व मोठा अनर्थ घडेल. त्यामुळे लगेच वीज पुरवठा बंद करण्यात आला व मोठा अनार्थ टळला, तातडीने घटनास्थळी महावितरण कर्मचारी आले व त्यांनी सदर त्या ठिकाणी पाहणी करून पुढील लाईट वायरिंग जोडून वीस पुरवठा सुरळीत केला. वेळेत महावितरण अधिकारी आल्यामुळे व कर्मचारी आल्यामुळे मोठा अनार्थ टळला.