





दर्पण न्यूज विटा प्रतिनिधी (शिराज शिकलगार) :- सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा विटा नगरपरिषद हद्दीमध्ये विटा मायणी रोड येथे तसेच विटा शहरातील सर्व प्रभागातून लोकप्रतिनिधी पासून लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ काजल म्हेत्रे, व उपनगराध्यक्ष अमोल बाबर उर्फ दादा, आरोग्य सभापती भालचंद्र कांबळे सर, तसेच विटा शहरातील सर्व प्रभागातील नगरसेवक नगरसेविका. स्वच्छता दूत पासून स्वच्छता कर्मचारी यांनी विटा शहरात स्वच्छतेमध्ये सहभाग घेत विटा नगरपालिकेचे प्रशासक मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांच्यासह सर्वच विटा नगरपालिकेचे पदाधिकारी यांनी स्वच्छता मोहीम जोरदार विटा शहरात राबवली आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी विटा शहर स्वच्छता करण्यासाठी हे सर्वजण रस्त्यावर उतरले आहेत. याचबरोबर विटा शहरातील नाले ओढे ओढा पात्र तसेच विटा शहरातील सर्व गटारी आरोग्य विभागाच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. या स्वच्छतेबरोबर विटा शहरातील विटा नगरपरिषद हद्दीमध्ये सर्वत्र झाडे लावा झाडे जगवा संपूर्ण शहर हरित करण्यासाठी वृद्धापासून तरुणापर्यंत लहानापासून थोरापर्यंत सर्वजण एकत्र येऊन खानापूर आटपाडी आणि विसापूर सर्कलचे विद्यमान आमदार सुहास भैया बाबर यांचे नेतृत्व जपत संपूर्ण रस्त्याकडेला संपूर्ण परिसर एक झाड संकल्पना राबवली जात आहे. असा उपक्रम विटा शहरात राबवत असताना स्वच्छतेचे एक पाऊल पुढे गर्दीचे ठिकाण सतत रहदारी लक्षात घेता विटा भाजी मंडई या परिसरात कट्टे गाळे गाड्यांच्या पुढील पायऱ्या तसेच अन्य परिसर स्वच्छ व सुंदर करण्यात संपूर्ण परिसर भाजी मंडई फवारणी करून अग्निशामक दल च्या वतीने अग्निशामक कर्मचारी व विटा नगरपालिकेकडील कर्मचारी यांनी स्वच्छ करून घेतले. यावेळी विटा भाजी मंडईतील सर्व व्यापाऱ्यांनी सुद्धा स्वच्छतेला सहकार्य करत अत्यंत चांगली कामगिरी विटा नगर परिषदेची चाललेली आहे असे म्हणत एक हात मदतीचा सर्व विटा नगरपरिषद मधील कर्मचाऱ्यांच्या बरोबर व्यापारी वर्गाने ही स्वच्छतेला सहभाग घेत आपला परिसर आपला कट्टा आपला भाग स्वच्छतेत सहभाग होऊन राबवला. त्यामुळे नेहमी स्वच्छता राहावं स्वच्छतेत आपण सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्षा सौ काजल म्हेत्रे, उपनगराध्यक्ष अमोल बाबर उर्फ दादा, आरोग्य सभापती भालचंद्र कांबळे सर, नगरसेवक संजय भिंगारदेवे, तसेच अमर शितोळे. त्याचप्रमाणे सर्व संबंधित पदाधिकारी नगरसेवक यांनी अनमोलचा परिश्रम घेत. सर्व विटेकर नागरिकांना स्वच्छतेमध्ये सहभागी व्हा असे आव्हान करत संपूर्ण विटा शहर स्वच्छता करून आपण पुन्हा एकदा सर्व विटेकर नागरिकांना बरोबरीने घेऊन सर्व माता-भगिनींना बरोबरीने घेऊन विटा शहर स्वच्छते सहभागी मध्ये सहभागी होऊ आणि देशात नंबर काढण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावे असेही आवाहन या लोकप्रतिनिधीकडून करण्यात आले. त्यामुळे आपल्या दारात आपल्या परिसरात घंटागाडी येत नसेल वेळेवर पाणी सुटत नसेल तर आपण विटा नगरपरिषद मुख्याधिकारी तसेच नगराध्यक्ष. तसेच उपनगराध्यक्ष. यांच्याशी आपण कधीही संपर्क साधू शकता असेही आव्हान करण्यात आले आहे. त्यामुळे आता विटा स्वच्छ आणि सुंदर होण्यासाठी सर्वजण सहभाग घेताना दिसून येत आहेत.
——————-
विटा शहरात स्वच्छ सुंदर सर्वेक्षण करण्यात येत आहे.. प्रत्येक प्रभागाचे नगरसेवक व नगरसेविका , तसेच विटेकर नागरिक, स्वच्छतेमध्ये रस्त्यावर उतरले आहे, विटा नगर परिषद मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांच्यासह सर्व संबंधित प्रशासकीय अधिक यांनीही स्वच्छतेमध्ये सहभाग घेतला आहे, विटा शहरातील भाजी मंडईतील कट्टे. संपूर्ण परिसर. आज सर्व भाजी विक्रीते, आरोग्य सभापती भालचंद्र कांबळे सर यांनी सहभाग घेता स्वच्छ व सुंदर पाण्याच्या फवाऱ्याने विटा नगरपालिका कर्मचारी यांनी धुवून घेतले. तसेच असेच रस्त्यावर उघड्यावर कचरा टाकणारा दंडात्मक कारवाई पासून ते सुचेना जारी करण्यात येत आहेत. व्यवसाय करत असताना नगरपरिषदेच्या माध्यमातून नगरपालिका हद्दीमध्ये व्यापार वर्गांना सर्व सुविधा उपलब्ध करत सर्वांनी नगरपरिषदेच्या आदेशाचे पालन करावे अशाही सूचना जारी करत आहेत, महिला वर्गापासून सर्व विटेकर नागरिक स्वच्छतेमध्ये सहभागी झाले आहेत. नगराध्यक्षा सौ काजल म्हेत्रे व उपनगराध्यक्ष अमोल बाबर उर्फ दादा यांनीही विटा शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी सहभाग घेत त्यांनी आपली कामगिरी चांगली केली आहे, खानापूर आटपाडी आणि विसापूर सर्कलचे विद्यमान आमदार सुहास भैय्या बाबर, यांनीही संपूर्ण मतदारसंघात व विटा शहरात विट्यातील संपूर्ण चारी बाजूला रोडच्या कडेला झाडे लावण्याचा निर्णय घेत, सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावे आणि एक झाड तरी आपण संकल्प राबवत लावावे अशा सूचना जारी केलेल्या आहेत. विटा भाजी मंडी येथील मच्छी मार्केट सुद्धा स्वच्छ आणि सुंदर करण्यात आले आहे, गांधी चौक, कराड रोड, चौंडेश्वरी चौक, या परिसरात रस्त्यावर बसणारी भाजी विक्रीते उठवले आणि ते सर्व भाजी विक्री ते भाजी मंडईतील कट्ट्यावर बसवण्यात आले आहेत, तर विटा शहरात भाजी मंडईकडील जाणाऱ्या रोडवरील रस्त्याकडे चे व्यापाऱ्यांना शिस्त पद्धतीने आपले सर्व दुकाने आत मध्ये घेऊन लावण्याचा सल्ला दिला आहे.
————–