दर्पण न्यूज विटा प्रतिनिधी( शिराज शिकलगार) :- सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा पोलीस ठाणे हद्दीत ( लेंगरे) गावांमध्ये दिनांक १५/५/२०२६ रोजी. ९ च्या सुमारास १६/५/२०२६ रोजी या दरम्यान फिर्यादी बाळासाहेब आकाराम गुजले, यांचे घराचे नवीन बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी बाळासाहेब यांच्या मालकीची चारचाकी ब्रेजा क्रमांक एम.एच. ०१/डी.ई.१८८४ या नंबरच्या वाहणावर अज्ञात इसमाने गोळीबार केला असल्याबाबत विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून , या गुन्ह्याचा तपासाच्या अनुषंगाने सांगली जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार दोशी व अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर मॅडम या घटनेतील सदर आरोपीचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर, विटा उपभागीय पोलीस अधिकारी विपूल पाटील व विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली, विटा पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार हे विटा पोलीस ठाणे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना, उत्तम माळी, देशमुख, अक्षय जगदाळे, यांना गोपनीय माहिती मिळाली की. सदर या गुन्ह्यातील इसमनामे प्रथमेश उर्फ सुदऱ्या दगडू खिल्लारे, हा खानापूर तालुक्यातील वाळूज येथे फिरत आहे, अशी गोपनीय माहिती सदर पोलीस पथकास मिळाली. या नंतर विटा पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार यांनी तातडीने घटनास्थळी जात सदर या गुन्ह्यातील संशयित इसम पोलीस पथकास पहात पळून जाण्याचा प्रयत्न करणार इतक्यात या पोलीस पथकाने त्या इसमास ताब्यात घेतले, विटा पोलीस ठाण्यात आणून त्या इसमाकडे कसून विटा पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्याने विटा पोलिसांना आपले नाव प्रथमेश उर्फ सुंदऱ्या दगडू खिल्लारे, असे सांगितले सदर गुन्ह्यात वापरलेली पिस्तूल कुठे आहे ,आणि या प्रकरणात कोण कोण सहभागी आहे असे चौकशी दरम्यान विचारले असता, सदर गुन्ह्यात वापरलेली पिस्टल त्याने प्रथमेश उर्फ पिन्या उर्फ मुकुंद शिंदे याने त्याच्या नवीन घराच्या समोर असलेले मोकळ्या प्लॉटमध्ये असणाऱ्या खड्ड्यामध्ये लपवून ठेवले आहे, सदरचे अग्निशस्त्रे ( पिस्टल) हे पोलीस उपनिरीक्षक अभिजित कणसे यांनी त्या ठिकाणाहून ताब्यात घेतले. सदर या गुन्ह्याचा तपास करित उर्वरित संशयित अन्य आरोपींचाही शोध घेत प्रथमेश उर्फ सुंदऱ्या दगडू खिल्लारे, ( वय वर्षे २०/रा.लेंगरे. ता.खानापूर). जिल्हा सांगली). तर प्रथमेश उर्फ पिन्या मुकुंद शिंदे. वय वर्षे २४/( राहणार लेंगरे. ता.खानापूर जिल्हा सांगली ( परागंदा ).व एक अनोळखी इसम ( परागंदा). यांच्या विरोधात विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून विटा पोलीसांनी यांना बेड्या ठोकल्या आहेत.पुढील तपास विटा पोलीस करित आहेत.