दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुने) :-
स्थानिक गुन्हे शाखा- दि.18.05.2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक धाराशिव जिल्ह्यातील मालाविषयी गुन्हे उघडकीस आणणे, पाहिजे फरारी आरोपी शोध तसेच अवैध शस्त्र बाळगणारे इसमांची माहिती काढून कारवाई करीता सपोनि अमोल मोरे, पोह/राहुल नाईकवाडी, शिंदे, अमोल चव्हाण, मपोह/ शोभा बांगर, चालक पोकॉ दहीहांडे असे रवाना होवून पेट्रोलिंग करत कन्हेरवाडी गावाजवळ आले असता पथकास गुप्त बातबीदारामार्फत माहिती मिळाली की, इसम नामे प्रशांत उर्फे भमड्या बालाजी काळे, रा. कन्हेरवाडी, ता. कळंब, अशोक नाना पवार, रा. बावी ता. वाशी हे दोघे मोटरसायकलवर कन्हेरवाडी पाटी येथे येणार असुन त्यांचे ताब्यात अग्नीशस्त्र असलेबाबत खात्रीलायक बातमी मिळाल्याने पथकाने नमुद ठिकाणी जावून 16.00 वा. सु. कन्हेरवाडी पाटी येथे थांबलो असता दोन इसम विना नंबर प्लेटच्या मोटरसायकलवर येताना दिसले. त्यास पथकाने थांबवले असता त्यातील एक इसम गावठी शस्त्र टाकुन पळुन गेला असता दुसऱ्यास इसमास पथकाने ताब्यात घेवून त्याचे नाव गाव विचारले असता त्यानी त्याचे नाव अशोक नाना पवार, रा. बावी शिवार काटशिवरी पारधी पिढी ता. वाशी ह.मु. कन्हेरवाडी ता. कळंब असे सागिंतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कंबरेला एक गावठी कट्टा मिळून आला. तो ताब्यात घेवून पळून गेलेल्या इसमा बाबत विचारले असता विशाल उर्फे प्रकाश उर्फे भामडया बालाजी काळे असे सागिंतले. इसम अशोक नाना काळे याचे कडील मोटरसायकल बाबत चौकशी केली असता त्याने सदर मोटरसायकल ही मुरुड ता. जि. लातुर येथुन चोरी करुन आणले बाबत सांगितले. त्याबाबत पोलीस ठाणे मुरुड येथे खात्री केली असता सदर मोटरसायकल चोरीचा मुरुड पोलीस ठाणे गुरनं 04/2025 कलम 303 प्रामाणे गुन्हा दाखल असल्याचे समजले. त्यानंतर दोन्ही गावठी कट्टे व मोटरसायकल पथकाने ताब्यात घेतली.
सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद ईज्जपवार, सपोनि अमोल मोरे, पोह/राहुल नाईकवाडी, बळीराम शिंदे, अमोल चव्हाण, मपोह/ शोभा बांगर, चालक पोकॉ दहीहांडे यांचे पथकाने केली आहे.