दर्पण न्यूज भिलवडी:- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील भिलवडी सार्वजनिक वाचनालय भिलवडी या संस्थेचा 86 वा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
सध्याचा काळ धावपळीचा आणि ताण तणावाचा काळ आहे. माणसाचे आयुष्य अस्थिर होत आहे. स्वतःला वाचवण्यासाठी सातत्याने सुंदर पुस्तकांचे वाचन करणे गरजेचे आहे, असे मत कोल्हापूरचे प्राध्यापक जयसिंगराव सावंत यांनी व्यक्त केले.
सार्वजनिक वाचनालय भिलवडी या वाचनालयाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या वाचन एक जीवनानंद या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.
12 मे 2026 रोजी वाचनालयाचा 86 वर्धापन दिन विविध उपक्रमाने संपन्न झाला सकाळच्या सत्रात प्राध्यापक मिलिंद जोशी पुणे यांनी भेट दिलेल्या सुमारे तीन लाख रुपये किमतीच्या पाचशे पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आलेले होते. उद्घाटन अध्यक्ष गिरीश चितळे यांचे हस्ते झाले. प्रदर्शनात दिवसभर सुमारे दीडशेहून अधिक वाचक ग्रामस्थांनी भेट देऊन पुस्तके वाचनाचा आनंद घेतला. सायंकाळी जयसिंगराव सावंत यांचे व्याख्यान संपन्न झाले यावेळी तेजस जाधव प्राध्यापक रोहित पाटील डॉक्टर सुमित साळुंखे अनिरुद्ध साळुंखे आणि श्रीमती सुनिता चितळे वहिनी यांचा विशेष सत्कार ग्रंथ भेट देऊन वाचनालयाचे वतीने करण्यात आला .तसेच वाचन आकलन उपक्रम आटपाडी येथे सहभाग घेतलेल्या सर्व वाचकांचा बालवाचकांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कारही करण्यात आला.
यावेळी यावर्षीच्या सर्वोत्कृष्ट ग्रंथोपासक पुरस्कार वाचनालयाच्या उत्तम वाचक वाचन कट्ट्यावरील सक्रिय सभासद आणि विविध उपक्रमां मध्ये सातत्याने यांना सहभाग घेणाऱ्या उर्मिला डिसले यांना पाहुण्यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट ग्रंथोपासक पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यवाहक सुभाष कवडे सर यांनी स्वागत प्रास्ताविक केले. डी आर कदम सर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. जयंत केळकर यांनी पुरस्काराची व सत्कारमूर्तींची माहिती सांगितली. अध्यक्ष गिरीश चितळे यांनी वाचनालयाच्या विविध उपक्रमांची माहिती सांगून भविष्यकाळातील संकल्पना ही विस्ताराने सांगितले. सौ. उर्मिला डिसले यांनी पुरस्काराबद्दल आपल्या भावना मनोगत आतून व्यक्त केल्या. सौ विद्या निकम यांनी आभार मानले . ग्रंथपाल मयुरी नलवडे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी वाचनालयाचे सर्व संचालक वाचन कट्टा सभासद बंधू-भगिनी वाचक व ग्रामस्थ, बंधू भगिनी, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.