

सॉफ्टबॉल संडे लीग स्पर्धा पलूस येथे उत्साहात
दर्पण न्यूज पलूस रामानंदनगर:- भारती विद्यापीठ प्रशाला, पलूस येथे झालेल्या संडे सॉफ्टबॉल लीग स्पर्धा पश्चिम महाराष्ट्र सॉफ्टबॉल अकॅडमी, पलूस यांनी संयोजन केले होते.संडे सॉफ्टबॉल लीग स्पर्धेमध्ये पाच संघानी सहभाग नोंदवला. पुणे, सोलापूर,कराड, सांगली, कोल्हापूर इत्यादी संघाने मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. स्पर्धेचे संपूर्ण संयोजन योगेश कुराडे, अभिलाष सिसाळ, गणेश पाटील, नितीन हिंगमिरे, चेतन एडके यांनी केले.विजेत्या संघांना रोख पारितोषिक देण्यात आले. आकर्षक चषक प्रदीप (आप्पा) कदम अध्यक्ष- स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समिती यांच्याकडून देण्यात आले. प्रदीप कदम म्हणाले सॉफ्टबॉल मधील राष्ट्रीय खेळाडू शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त,राज्य क्रीडा मार्गदर्शक प्रितेश पाटील हे पालघर जिल्हा येथून या ठिकाणी खेळण्यासाठी आल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक केले.या खेळामुळे हजारो विद्यार्थी शासकीय सेवेत भरती झाल्यामुळे त्यांनी अभिमान व समाधान व्यक्त केल. त्यांनी हा खेळ वाढवण्यासाठी व भविष्यात स्पर्धा घेण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. पारितोषिक वितरण समारंभासाठी अमीर पठाण, तुकाराम धायगुडे, संजय शिंदे, तानाजी जाधव हे मान्यवर उपस्थित होते. सांगली जिल्हा सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव अभय बिराज यांनी सांगली जिल्हाने आजपर्यंत राज्यस्तरीय स्पर्धां चे नेटके आयोजन केले व सांगली जिल्हा संघाने विविध राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये प्राविण्य मिळवले आहे याची माहिती दिली. संतोष साळुंखे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. आरपीएस सॉफ्टबॉलचे उद्योजक ऋषिकेश गरड यांनीही कोल्हापूर संघातून खेळण्याचा आनंद घेतला. सर्व खेळाडूंना चहा, नाश्ता, जेवण देण्यात आले. स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे प्रथम -पुणे द्वितीय -कराड तृतीय- सांगली प्रत्येक सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूला मेडल देऊन गौरवण्यात आले. राष्ट्रीय खेळाडू सुरज , अतुल खोत यांनी स्पर्धेसाठी सदिच्छा भेट दिली.